शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीवर लक्ष केंद्रीत करा : देवकाते

By admin | Updated: April 10, 2017 02:11 IST

जिल्ह्यात कुपोषित मुलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून कुपोषणमुक्तीकडे अधिकाऱ्यांनी

पुणे : जिल्ह्यात कुपोषित मुलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गंभीर बाब असून कुपोषणमुक्तीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिल्या़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ़ आनंदीबाई जोशी पुरस्कार सोहळ्यात देवकाते बोलत होते़ यावेळी एनएबीएच, कायाकल्प मानांकन मिळविलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा गुणगौरव, तसेच मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम व शारदाग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला़ याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण सभापती चौरे आदी उपस्थित होतेदेवकाते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे काम राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रथम क्रमांकाचे असून त्यासाठी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे़ गेल्या काही महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूने जिल्ह्यात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ९ जण हे ग्रामीण भागातील आहेत. याबाबतही आरोग्य यंत्रणेने जनजागृती करावी, असे आवाहन देवकाते यांनी केले वळसे पाटील म्हणाले, आरोग्य विभागाचे चांगले काम असल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास वाढला आहे़ बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ग्रामीण भागातही विविध प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याबाबतही येत्या काही दिवसांमध्ये जनजागृती करावी़ जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अतोनात कष्ट घेतल्याचे दौलत देसाई यांनी सांगत जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. देशात एकमेव जिल्हा परिषद असल्याचे सांगितले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भगवान पवार यांनी केले तर सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले़. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी येणारे रुग्ण हे गरीब असतात त्यामुळे त्यांना चांगली सेवा द्या़ तसेच दवाखान्यांमध्ये स्वच्छता व टापटीप ठेवा आणि लसींची कमतरता भासू देऊ नका़ सध्या स्वाइन फ्लूची साथ असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे- प्रवीण माने, सभापती आरोग्य व बांधकाम समिती