शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाॅवर १ रूपया किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: महिनाभरापूर्वी 30 रुपये किलो असा भाव असलेली फ्लाॅवर आता एक रुपया किलो या दराने विकली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: महिनाभरापूर्वी 30 रुपये किलो असा भाव असलेली फ्लाॅवर आता एक रुपया किलो या दराने विकली जात आहे. या भावात शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने फ्लावर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

आंबेगाव तालुक्यात फ्लॉवर पिकाचे उत्पादन अनेक गावांमध्ये घेतले जाते. विशेषता पिंपळगाव, निरगुडसर, वडगाव काशिंबेग, लांडेवाडी, नारोडी, अवसरी, गावडेवाडी, काठापुर, महाळुंगे पडवळ, कळंब या गावातील शेतकरी फ्लॉवर पिक घेत असतो. यावर्षी मध्यंतरी पडलेल्या मुसळधार पावसाने लागवड केलेले शेतातील फ्लॉवर पिक नष्ट झाले. त्यामुळे फ्लावर पिकाचा तुटवडा भासुन बाजारभाव कडाडले. दहा किलोस 300 ते 350 रुपये असा भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा या पिकाकडे वळाल्या. बटाटा बियाण्याचे बाजारभाव नऊ हजार रुपये क्विंटल असे विक्रमी झाले. कांदा रोपे पावसाने नष्ट झाली होती.त्यामुळे बटाटा व कांद्याची लागवड करणारा शेतकरी फ्लॉवरकडे वळाला. परिणामी लागवड क्षेत्र प्रमाणापेक्षा जास्त वाढले. पूर्वी घरी फ्लाॅवर रोपे तयार केली जात होती. आता रोपवाटिकेतून तयार रोपे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना लगेच फ्लॉवर पिकाची लागवड करता आली. सध्या मोठ्या प्रमाणावर फ्लॉवरचे उत्पादन निघत असून त्यामुळे बाजारभाव ढासळले आहेत. एक नंबर फ्लाॅवर ३० ते ४० रुपये तर दोन नंबर फ्लावर १० ते २० रुपये दहा किलो या भावाने विकली जाते. याचा अर्थ एक ते चार रुपये किलो अशा मातीमोल भावाने विक्री होत आहे.

चौकट

पिकांत सोडली जनावरे

एकरी तीस हजार रुपये खर्च या पिकासाठी येतो. 70 ते 80 पैसे या भावाने फ्लॉवरचे एक रोपे मिळते. त्यासाठी सुमारे पंधरा हजार रुपये खर्च येतो. औषधे, खते, मजुरी याचा खर्च वाढला आहे, अशी माहिती महेश मोरे यांनी दिली. सुदैवाने यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला आहे. पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला. तर औषध फवारणी करावी लागते. सध्या मिळत असलेल्या बाजारभावाने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही वसूल होत नाही. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली आहेत.

कोट

चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने फ्लाॅवर पिकाचे उत्पादन घेतले. मात्र सध्या भाव पूर्णपणे ढासळले आहेत. अगदी वाहतूक खर्चही वसूल होत नाही. शेतातील पीक तसेच सोडून देऊशी वाटत नाही. म्हणून फ्लाॅवर तोडून बाजारात नेली जाते. मात्र एक ते चार रुपये किलो या भावाने फ्लाॅवर विकली जात आहे.

- बबन हुले, उत्पादक