पुणो : लोकसभेपाठोपाठ अवघ्या सहा महिन्यांत येणा:या विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झालेल्या हवशा, नवशा, गवशांमुळे शहरात अनधिकृत ‘फ्लेक्सबाजी’ला उधाण आले आहे. आपणच आमदारकीचे दावेदार आहोत, हे दाखवून देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत शहरात ठिकठिकाणी लावलेले तब्बल 72 हजार फ्लेक्स गेल्या मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीत पालिकेने काढले आहेत. विशेष म्हणजे आणखीन तेवढेच फ्लेक्स शहरात असल्याची कबुलीही पालिका प्रशासनाकडून दिली जात आहे.
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका संपताच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेध शहरातील विद्यमान आमदार आणि आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकत्र्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे आपणही इच्छुक आहोत याची जाहिरातबाजी करण्यासाठी, तसेच शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या इच्छुकांकडून शहरात होर्डिग, फ्लेक्स, बोर्डच्या जाहिराती केल्या जात आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता प्रमुख चौक, शाळा, महाविद्यालये, तसेच पदपथांच्या परिसरात लावले जात आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण तर होत आहेच, पण त्याचबरोबर पालिकेचा कोटय़वधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. फ्लेक्सप्रकरणी राज्य शासन तसेच न्यायालयानेही महापालिकेस धारेवर धरले आहे. त्यामुळे महापालिकेकडून गेल्या सहा महिन्यांत या जाहिरातींवर मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारी ते 14 ऑगस्ट 2क्14 अखेर र्पयत पालिकेने कारवाई करून शहरातील तब्बल 72 हजार 59 जाहिराती काढलेल्या आहेत. त्यात सर्वाधिक प्रमाण हे कापडी बॅनर्सचे आहे, तर त्या खालोखाल बोर्ड आणि पोस्टरची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शहराचे विद्रूपीकरण होत असतानाही पालिकेने या सहा महिन्यांत अवघ्या 14 तक्रारी पोलिसांमध्ये दाखल केल्या आहेत. मात्र, त्यातील एकावरही अद्याप गुन्हा दाखल झालेला
नाही. (प्रतिनिधी)
4चमकोगिरी करणा:यांची संवेदनशीलताही हरविल्याचे दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्यात झालेल्या माळीण दुर्घटनेच्या घटनेचा वापरही अनेकांनी जाहिरातीसाठी केला होता.
4या दुर्घटनेची विदारक छायाचित्रे लावून या महाभागांनी त्यांना श्रद्धांजलीं वाहणारे फ्लेक्स लावले होते. त्यात आपल्या नावाच्या मित्रमंडळासह आपले जवळचे कार्यकर्ते आणि स्थानिक मंडळांची नावे या फलकांवर झळकवली जात होती.
4काही ठिकाणी क्रांतिदिनाचे , स्वातंत्र्य दिनाचे फलकही लावण्यात आले आहेत.
आता मोर्चा गल्लीबोळांकडे
4महापालिकेची गेल्या सहा महिन्यांतील कारवाई ही शहरातील प्रमुख दर्शनी भागात असलेल्या फ्लेक्सवर होती. त्यामुळे फ्लेक्सबाजांनी आपला मोर्चा आता गल्लीबोळांमध्ये वळविला आहे. दहीहंडी, गणोशोत्सव जवळ येऊ लागल्याने या उत्सवांच्या जाहिरातीचे फ्लेक्सही झळकू लागले आहेत. अनेक इच्छुकांनी श्रवण महिन्याची संधी साधत मतदारांसाठी तीर्थयात्रंचे आयोजन केले असून, मतदारसंघातील प्रत्येक लहान लहान चौकात फ्ल्केस लावले जात आहेत. या ठिकाणी फ्लेक्स लावण्यावरून वादही होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा महिन्यांत अवघ्या 14 तक्रारी
4शहरात लागणा:या अनधिकृत फ्लेक्सबाजांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालय तसेच राज्य शासनाने अनेकदा महापालिकेस दिलेले आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांत अवघ्या 14 जणांविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, एकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून दोन दोन दिवस कागदपत्रंची पूर्तता आणि इतर माहितीसाठी बसवून घेतले जात असल्याने पालिका कर्मचारी तक्रारी देण्यास धजावत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
‘कै’च्या कायपण
4फ्लेक्स होर्डिग्सवर झळकण्याची काहींना इतकी सवय झालेली असते, की काही जरी कार्यक्रम असला, तरी लाव फ्लेक्स, अशीच अवस्था सध्या तरी निदर्शनास येत आहे. यामध्ये फ्लेक्सवर अगदी कैलासवासींपासून ते पाच-सात वर्षाच्या पोरा-ठोरांचा समावेश आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी अगदी ‘कै ’च्या कायपण करण्यासाठी हे प्रसिद्धीलोलुप महाशय तयार असतात. पण, त्यांच्या या फ्लेक्सबाजीमुळे शहर मात्र बटबटीत होत आहे.