शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगले फ्लेक्स वॉर

By admin | Updated: December 31, 2016 05:31 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू झाले आहे. विकासाच्या वाटेवर पिंपरी-चिंचवडकर

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू झाले आहे. विकासाच्या वाटेवर पिंपरी-चिंचवडकर अशी राष्ट्रवादीने, तर भ्रष्टाचार आणि भयमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी भाजपा सरकार अशी फ्लेक्सबाजी भाजपाने केली आहे. आरोप-प्रत्यारोपांनतर फ्लेक्स वॉर सुरू झाले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच या दोन्ही पक्षांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. पक्षीय पातळीवरील आरोप वैयक्तिक पातळीवर आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरकारभाराला भाजपाने लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीतील आणि शिवसेनेतील ठरावीक नेत्यांना लक्ष्य करण्याचे धोरण भाजपाने आखले आहे. भाजपाने स्वतंत्रपणे फ्लेक्सबाजी केल्याने युतीची शक्यता मावळली आहे. तर या फ्लेक्सबाजीत शिवसेना, मनसे व इतर पक्ष कोठेही दिसत नाही. फ्लेक्सवॉरची चर्चा आहे.(प्रतिनिधी)आरोपांवर भर, ठोस कारवाई नाहीचशिवसेनेवरील टीकेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कानपिचक्या दिल्याने शिवसेनेवरील आरोप कमी करून राष्ट्रवादीला लक्ष केले आहे सत्ताधारी व विरोधात प्रत्यारोपांचे वॉर सुरू असतानाच आता फ्लेक्सवॉर सुरू झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौकांमध्ये भाजपाने आणि राष्ट्रवादीने फ्लेक्स उभारले आहेत. विकास हा मुद्दा राष्ट्रवादीने घेतला आहे. बीआरटी, उड्डाणपूल, विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची छायाचित्रे वापरून विकासाच्या वाटेवर पिंपरी-चिंचवडकर, अशी फ्लेक्सबाजी राष्ट्रवादीने केली आहे. तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र वापरून भय आणि भ्रष्टाचारमुक्त शहरासाठी, अशी फ्लेक्सबाजी भाजपाने केली आहे.