शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्स, झेंडे हटविले

By admin | Updated: January 10, 2017 04:02 IST

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील राजकीय फ्लेक्स काढण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे

पुणे : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील राजकीय फ्लेक्स काढण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. रविवारी रात्रीपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण ३६ हजार ४५० बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर काढून टाकले. या साफसफाईमुळे शहरातील अनेक चौक, रस्ते चकाचक झाल्याचे दिसत होते.आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांचे बोर्ड, चिन्ह यांचे फ्लेक्स लावण्यास मनाई करण्यात आली. राजकीय पक्षांचे बोर्ड या काळात झाकून ठेवले जातात. येत्या एक-दोन दिवसांमध्ये महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी शहरातील प्रमुख चौक, गल्लीबोळांत मोठ्या प्रमाणात पक्षाची जाहिरातबाजी केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही साफसफाई करण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच ही मोहीम हाती घेण्यात आली.बोर्ड, झेंडे व पोस्टरही मोठ्या प्रमाणात काढण्यात आले, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांनी दिली.निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांपुढे झळकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चौकात फ्लेक्स, बॅनर उभारण्यासाठी अत्यंत कमी खर्च येत असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून याचा सर्रास वापर करण्यात येत आहे. फ्लेक्समुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण होत असल्याने त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी याचिका दाखल केली होती. याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारण्यावर निर्बंध घातले आहेत, राजकीय पक्षांकडून असे फ्लेक्स उभारल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे ओदश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, काही राजकीय पक्षांना थेट उच्च न्यायालयाने लाखो रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मात्र, तरीही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजीचा आधार घेतला जात आहे. न्यायालयाच्या कारवाईचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.फ्लेक्सवरील कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडील मनुष्यबळ आकाशचिन्ह विभागाने घेतले होते. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिरिक्त मनुष्यबळ या कारवाईसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.