शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाढला पक्ष्यांचा चिवचिवाट

By admin | Updated: May 12, 2016 01:09 IST

दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत असताना नागरिकांनी मात्र पशू-पक्ष्यांप्रती सहानुभूती दर्शविली आहे. पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याची सोय झाल्याने निगडी प्राधिकरणात पक्ष्यांचा

सांगवी : दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत असताना नागरिकांनी मात्र पशू-पक्ष्यांप्रती सहानुभूती दर्शविली आहे. पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी व चाऱ्याची सोय झाल्याने निगडी प्राधिकरणात पक्ष्यांचा सुमधुर चिवचिवाट नेहमीपेक्षा जास्त वाढला आहे. नागरिकांमध्ये दर वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळामुळे पशु-पक्ष्यांप्रती जनजागृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांनी गच्ची, घराच्या गॅलरीत, खिडकीत पिण्याची पसरट प्लॅस्टिकची व मातीची भांडी ठेवली आहेत. तसेच, पक्ष्यांना खाण्यासाठी वेगवेगळी कडधान्ये ठेवली आहेत. काहींनी पक्ष्यांचे खाद्य विकत आणले जाते. यामुळे पक्ष्यांचा थवा पशू-प्राणिप्रेमींच्या घरासमोर भल्या पहाटेच जमू लागतात. पक्ष्यांचे विलोभनीय दृश्य पाहून नागरिक सुखावले आहेत. पशुपे्रमींनी धान्य नित्यनियमाने ठेवल्याने रोज ठिकठिकाणी पक्ष्यांचा थवा जमा होत आहे. त्यामुळे अन्न-पाण्याअभावी होणारी पक्ष्यांची भटकंती काही प्रमाणात थांबली आहे. प्राधिकरणातील सेक्टर २४, २५, २६, २७, २८ या भागात उद्यानांचे प्रमाण जास्त असल्याने घनदाट झाडी आहेत. तसेच जवळच दुर्गादेवी टेकडी लागून असल्याने भटकंती करत आलेल्या पक्ष्यांचे प्रमाण या भागात जास्त दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष्यांचा चिवचिवाट जास्त प्रमाणात दिसून नागरिकांच्या कानी पडत आहेत. काही पक्षीप्रेमींनी उद्यानातदेखील प्लॅस्टिकच्या बाटल्या अर्ध्या कापून लटकविल्या आहेत. तर काहींनी आईसक्रीमची रिकामी भांडी लटकवली आहेत.(प्रतिनिधी)