शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

‘सेझचा’ पेच महिनाभरात सोडवा

By admin | Updated: November 3, 2015 03:29 IST

सेझमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच केडीएल कंपनीच्या भागधारकांना परताव्याच्या १५ टक्के विकसित जमिनी द्याव्यात किंवा आजच्या दराने मोबदला द्यावा

राजगुरुनगर : सेझमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच केडीएल कंपनीच्या भागधारकांना परताव्याच्या १५ टक्के विकसित जमिनी द्याव्यात किंवा आजच्या दराने मोबदला द्यावा आणि महिनाभरात प्रश्न मार्गी लावावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केडीएल आणि केईआयपीएल या कंपन्यांना दिले. खेड तालुक्यातील सेझच्या प्रस्तावित दुसऱ्या टप्प्यासाठी १३ गावांच्या जमिनींवर टाकलेले प्रस्तावित भूसंपादनासाठीचे शिक्के काढण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी पुन्हा दिले आहे; अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी दिली. आज मुंबई येथे खेड सेझप्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, योगेश पांडे, बापू करंडे यांनी बाजू मांडली. त्यांनी केडीएल व केआयईपीएल कंपनी यांच्या ताब्यात असलेल्या १५ टक्के जमिनी करारानुसार ताबडतोब परत करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना करारानुसार जमिनी परत मिळायला पाहिजे किंवा बाजारदराने योग्य मोबदला दिला गेला पाहिजे, अशी भूमिका घेतली. परताव्यानुसार जमिनी परत करण्यासंबंधी एमआयडीसीचे राज्याचे मुख्याधिकारी भूषण गगरानी यांना केआयईपीएलची भूमिका जाणून घेण्यासंबधी सांगितले. प्रकल्पग्रस्तांची १८३ हेक्टर जमीन अविकसित परत देणे आणि विकसनासाठी कपात केलेली २५% रक्कम सव्याज परत करणे, असाही प्रस्ताव आज मांडण्यात आला. आज तोडगा अपेक्षित होता; पण महिनाभरात तो काढावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले. पण केडीएल कंपनी गुंडाळणार असल्याचे संकेत मात्र आज मिळाले. आजच्या बैठकीसाठी पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, केडीएल व केईआयपीएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीकरिता शेतकरी काशिनाथ दौंडकर, बाळासाहेब माशेरे, विष्णू दौंडकर, राजाराम गोरडे, मारुती गोरडे, मारुती सुक्रे, धोंडीबा साकोरे, नाना लोखंडे, काशीनाथ हजारे आदी सेझबाधित शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)आजच्या बैठकीत दुसरा निर्णय १३ गावांचे सातबारा कोरा करण्यासंबंधीचा झाला. 'संपादनासाठी प्रस्तावित' या नोंदी रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. आजही त्यांनी हे शिक्के काढण्यात येतील असे आश्वासन पुन्हा दिले. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ८ नोव्हेंबर रोजी पुकारलेले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले.