शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

इराणी चोराकडून एका तासात पाच सोनसाखळ्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:35 IST

आरोपीसंदर्भात माहिती मिळाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याच्या नातेवाइकांनी हल्ला देखील केला होता.

पुणे : सिंहगड, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तासाच पाच सोनसाखळ्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन) मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या सराइतावर विविध जिल्ह्यांत सोनसाखळी चोरीचे २१ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ५ लाख २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुलाम अली सरताज अली जाफरी (३0, रा. आंबिवली, जि.ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात परिमंडळ तीनच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळ्या चोरीची कबुली आरोपीने दिली आहे. त्याने एका तासात सिंहगड, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच सोनसाखळ्यांची चोरी केली होती.

आरोपीसंदर्भात माहिती मिळाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकावर त्याच्या नातेवाइकांनी हल्ला देखील केला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषणही करण्यात आले होते. त्यामध्ये तो ठाण्यातील आंबिवली येथील असल्याचे उघड झाले होते. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने सिंहगड रस्ता ३, वारजे १, कोथरुड २, अलंकार १ अशा एकूण सात सोनसाखळी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा ५ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याचा साथीदार आणि एक नातेवाईक देखील निष्पन्न झाला आहे. त्यांचा पोलीस पथके शोध घेत आहेत. संबंधित आरोपी हे इराणी असून त्यांच्यावर यापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, अहमदनगर या ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.४ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, जीवन मोहिते, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, सचिन माळवे, नीलेश जमदाडे, बाबुलाल तांदळे, दयानंद तेलंगे पाटील, अविनाश कोंडे, किशोर शिंदे, मयूर शिंदे, योगेश झेंडे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रफिक नदाफ, हरीश गायकवाड, श्रीकांत दगडे, योगेश बडगे, किरण राऊत, संदीप धनवटे, वामन जाधव, मोहन भुरुक, राजेश सुर्वे, नीलेश कुलथे, पुरुषोत्तम गुन्ला, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरी