शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत घरपट्टीमध्ये पाच टक्के सूट

By admin | Updated: January 2, 2015 23:17 IST

नगरपरिषदेच्या २०१४- १५ ते २०१७-१८ च्या चतुर्थ वार्षिक करआकारणीत बारामती नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ आणि ३ मध्ये ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे.

बारामती : नगरपरिषदेच्या २०१४- १५ ते २०१७-१८ च्या चतुर्थ वार्षिक करआकारणीत बारामती नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ आणि ३ मध्ये ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे. सहायक नगररचनाकार सुनील मरळे यांनी करआकारणीत सर्व हरकतींवर सुनावणी घेतली. त्यानंतर झोन क्रमांक १ मधील सिद्धेश्वर गल्ली, श्रीराम गल्ली, ढोर गल्ली, भोई गल्ली, खाटीक गल्ली, कसाब गल्ली, मुजावर वाडा, गोकुळवाडी, श्रावण गल्ली, बुरूडगल्ली, बाबर बोळ, तालीम गल्ली, पंचशीलनगर, साठेनगर, कसबा आदी भागात नगरसेवक सुनील सस्ते यांच्या विनंतीवरून समक्ष पाहणी केली. झोन क्रमांक १ मध्ये परिसर येत असताना यातील मुख्य रस्ता वगळता अंतर्गत रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही. या भागात गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचा समावेश आहे. तरीदेखील सर्वाधिक घरपट्टीचा दर या नागरिकांना द्यावा लागतो. २० वर्ष हे नागरिक वाढीव दराने घरपट्टी भरत आहेत. या नागरिकांना सूट मिळावी, अशी मागणी नगरसेवक सस्ते यांनी केली होती. दरम्यान, झोनमधील मुख्य रस्ते वगळता सर्व बिगर व्यावसायिक मिळकतधारकांना ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट देण्यात आली आहे. हरकतदारांनी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांनी नगरपरिषदेच्या झोन क्रमांक १ व ३ मधील मुख्य रस्ते वगळता बिगर व्यावसायिक मिळकतधारकांना ५ टक्के घरपट्टीमध्ये सूट दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)सूट समाधानकारक नाहीवास्तविक पाहता चतुर्थ करआकारणीत सरसकट २० टक्के केलेली दरवाढ अन्यायकारक आहे, असे असताना १० हजारांहून अनेक नागरिकांनी हरकती घेतल्या. मात्र, दिलेली सूट समाधानकारक नाही. सर्वांनी या प्रकरणी लक्ष दिले असते तर शहराला घरपट्टीमध्ये समाधानकारक सूट मिळाली असती, असे नगरसेवक सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.