शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Updated: May 7, 2015 05:15 IST

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून रविवारी रात्री निर्घृण खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा धारदार हत्यारांनी वार करून रविवारी रात्री निर्घृण खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यातील तिघांना हडपसरजवळील हांडेवाडीतून ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी सांगितले. नितीन दत्तात्रय कसबे (वय २१, रा. आंबिल ओढा वसाहत, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विनायक ऊर्फ काळ्या विलास रणदिवे (रा. कृष्णानगर, महंमदवाडी), सूरज संजय घुटे (रा. १४४, दांडेकर पूल), राहुल ऊर्फ श्रावण अशोक बुरगुले (रा. १३४, दांडेकर पूल), चैतन्य ऊर्फ चैत्या मच्छिंद्र रणदिवे (रा. १३३, आंबिल ओढा सोसायटी, दांडेकर पूल), चंद्रकांत बसप्पा कांबळे (रा. १३३, दांडेकर पूल) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरारी आहेत. अनिल दत्तात्रय कसबे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे.उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या सूचनांनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव, सहायक निरीक्षक देशमाने, पोलीस कर्मचारी फुलपगारे, मोहिते, खोमणे, जमदाडे, कुदळे, गवळी यांच्या पथकाने आरोपींंना अटक केली. (प्रतिनिधी)आंबिल ओढा वसाहतीतील घटना४नितीन आणि आरोपींचे पूर्वीचे भांडण आहे. या भांडणाच्या रागामधून त्याचा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आंबिल ओढा वसाहतीमध्ये खून करण्यात आला. माजी महापौर माऊली शिरवळकर यांच्या घराशेजारी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. कसबेला एकटे गाठून त्याचा खून करण्यात आला होता.