शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आणखी पाच जणांना अटक

By admin | Updated: October 25, 2016 06:25 IST

तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी सोमवारी (दि. २४) मध्यरात्री दीडला पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी सोमवारी (दि. २४) मध्यरात्री दीडला पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तळेगाव पोलिसांनी पुणे येथे व मावळ परिसरात ही कारवाई केली.आज पाचही आरोपींना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेळके खून प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. मात्र मुख्य आरोपी श्याम दाभाडेसह त्याचे अन्य साथीदार फरार आहेत.रुपेश सहादू घारे (वय २५ रा. महागाव, मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३० रा. रुपीनगर, तळवडे, हवेली), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३, दोघेही रा. काले कॉलनी, पवनानगर, मावळ), सचिन लक्ष्मण ठाकर (वय २६, रा. ठाकूरसाई, मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. शेळके खूनप्रकरणी यापूर्वी अटक केलेले बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (वय ३५ रा. कोटेश्वरवाडी, मावळ,), संदीप सोपान पचपिंड (वय ३० रा. आंबी, मावळ), खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (वय ३० रा. माळवाडी, मावळ), आकाश दीपक लोखंडे (वय २१, रा. जोशीवाडा, तळेगाव दाभाडे) या चौघांच्याही पोलीस कोठडीत आज ३० आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर) पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी मागील रविवारी (दि. १६) सकाळी येथील खांडगे पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला. या प्रकरणातील देवानंद खर्डे, नितीन वाडेकर, दत्ता वाघोले, सूरज गायकवाड, अभिषेक गायकवाड, अजय हिंगे हे संशंयित अद्याप फरारी आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत.