शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘आवास’साठी सव्वा लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:40 IST

बहुचर्चित पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर १ लाख १३ हजार २२८ नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बहुचर्चित पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर १ लाख १३ हजार २२८ नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मालकी हक्काचे घर नसलेल्यांना सन २०२२ पर्यंत घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.पंतप्रधान आवास योजनेसाठी सोमवार, ७ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुदत समाप्तीनंतर १ लाख १३ हजार अर्ज दाखल झाले. यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत २८ हजार ९०, गृहकर्जावरील व्याजाच्या सवलतीसाठी २८ हजार १४८, परवडणाºया घरांसाठी ४१ हजार ७८३ आणि स्वत:च्या जागेवर घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मागणाºयांचे १५ हजार २०७ अर्ज आले आहेत. महापालिकेकडे आलेल्या एकूण अर्जांपैकी आतापर्यंत ३० हजार अर्जांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली आहे, उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आॅनलाइन अर्ज भरताना अनेक अर्जदारांकडून चुका झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, तांत्रिक चुकांमुळे अर्जदार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी या त्रुटी दूर करण्यासाठी आणखी एक संधी अर्जदारांना दिलीजाणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी पूर्ण करून पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शहर तसेच ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित घटकातील जनतेला अल्प व्याजदराच्या कर्जावर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे शहर आणि ग्रामीण भागातील गृहक्षेत्राच्या विकासाला चालना दिली जाणार आहे. शहरी भागामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए), गृहकर्जाच्या व्याजावर सवलत, परवडणाºया किमतीत घरे आणि स्वत:च्या मालकीच्या जागेवर घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे अशा चार घटकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.