शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

परांजपे बंधूंविरोधात डोंगरेंचा साडेपाचशे पानी 'पुरावे बॉम्ब'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू यांच्या विरोधात तक्रारदार वसुंधरा डोंगरे यांच्या वकिलाने शुक्रवारी दिंडोशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधू यांच्या विरोधात तक्रारदार वसुंधरा डोंगरे यांच्या वकिलाने शुक्रवारी दिंडोशी कोर्टात जवळपास ५४५ पानांचा 'पुरावे बॉम्ब' सादर केला. त्यामुळे परांजपे बंधूच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ती २९ जुलै रोजी करण्यात येणार आहे.

विलेपार्ले भूखंड घोटाळा प्रकरणातील फिर्यादी डोंगरे यांच्या वकिलांना कोर्टात काही कागदपत्रे सादर करायची असल्याने त्यांनी कोर्टाकडे १६ जुलै, २०२१ पर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार शुक्रवारी डोंगरे यांचे वकील ऍड जगदीश शिंगाडे यांनी ५४५ पानी पुरावे सादर केले आहेत. यातून परांजपे बिल्डर यांनी अद्याप कशा प्रकारे लोकांची फसवणूक केली आहे याबाबतचा खुलासा आता कोर्टासमोर होणार असल्याचा विश्वास तक्रारदार डोंगरे यांना आहे. डोंगरेंनी केलेल्या आरोपात तथ्य नसून त्यांना विनाकारण जुन्याच प्रकरणात गुंतवून तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्रास दिला जातोय, असे परांजपे यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी सांगितले होते. त्यानुसार आरोपात असलेले तथ्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न डोंगरे कुटुंबीयांकडून केला जात आहे. विलेपार्लेच्या एअरपोर्ट कॉलनीतील भूखंड अनधिकृतपणे वाढवून घेतल्याचा आरोप परांजपे बिल्डर आणि जयविजय सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात वसुंधरा डोंगरे (७०) यांनी केला आहे. त्यानुसार विलेपार्ले पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांना पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले होते.

आरोपींची कार्यपद्धती होणार उघड

'आम्ही आज पुण्यातील परांजपे बिल्डर विरुद्धच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दिंडोशी कोर्टात फिर्यादी यांच्या वतीने हस्तक्षेप अर्ज व त्यांचे म्हणणे मांडले आहे. त्याच्या पहिल्या ४५ पानांत फिर्यादीने अनेक गोष्टींचा उलगडा करत आरोपींची विविध प्रकरणातील कार्यपद्धती दर्शविणारी कागदपत्रे पुरावा म्हणून जोडली आहेत. ज्यात एकूण १०६ दस्त म्हणजे सुमारे साडेपाचशे पानांचा समावेश असून याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जुलै, २०२१ रोजी होणार आहे.

(अॅड. जगदीश शिंगाडे - फिर्यादी डोंगरे यांचे वकील)