शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्वसननलिकेतून काढला मासा; बालिकेला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:13 IST

जुनाट समजुतीमुळे घडला अनर्थ

बारामती : तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते, अशी जुनाट समजूत खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात मंगळवारी (दि.२९) दुपारी अनर्थ घडला. बालिका लाळ गाळत असल्याने तिच्या मावशीने या मुलीच्या तोंडात फिरविण्यासाठी मासा सोडला. दुर्दुैवाने तो मासा निसटून थेट त्या मुलीच्या श्वासमार्गात अडकला. त्यानंतर मृत्यूच्या दाढेत गेलेल्या त्या मुलीला वाचविण्यासाठी तिच्या जन्मदात्याने प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर बारामतीच्या डॉक्टरांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत हे संकट दूर केले.मुळचे चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बापू माळी यांचे कुटुंब पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी आले आहेत. ते सध्या शिर्सुफळ येथे आहेत. त्यांना साडेचार महिन्यांची मुलगी आहे. तिचे नाव अनू असून ती जन्मल्यापासून लाळ गाळते. त्यामुळे त्यावर उपाय करण्यासाठी मुलीच्या मावशीने लाळ गळणे बंद होण्यासाठी लहान मुलीला तोंडात मासा ठेवून घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मासा बुळबुळीत असल्याने थेट हातातून निसटून मुलीच्या श्वास नलिकेत अडकला. तिच्या वडिलांनी दुचाकीवर बसवून तिला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, दुचाकीतील पेट्रोल संपले.त्यानंतर जिवाच्या आकांताने बापु माळी यांनी रस्त्यावर मदतीची याचना केली.तेथुन जाणाऱ्या स्कुलबस चालकाने त्यांना बारामतीत आणले.त्यांनी मुलीला शहरातील डॉ. राजेंद्र मुथा यांच्याकडे आणले.तोपर्यंत काही कालावधीत मुलीचा श्वास बंद होत, हृदय बंद पडण्याची क्रिया सुरू झाली होती. यावेळी यावेळी डॉ. सौरभ मुथा यांनी मुलीची तपासणी करीत जीवन संजीवनी क्रिया करून बंद पडलेला श्वासासह तसेच हृदय पूर्ववत सुरू केले. तसेच दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया करून तीस मिलिमीटर लांबंीचा गिळलेला मासा बाहेर काढला. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे साडे चार महिन्याच्या मुलीला जीवदान मिळाले. यावेळी भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार, डॉ. वैभव मदने यांनी मोठे कौशल्य वापरुन प्रयत्न केले.मुलीला दोन दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडणार आहे. मुलीचे कुटुंबिय आर्थिक अडचणीत असल्यामुळे मुलीला थंडीच्या बचावासाठी उबदार कपडे मोफत भेट देण्यात आले असल्याचे डॉ सौरभ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल