शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आधी बांधला पूल, नंतर घेतली परवानगी

By admin | Updated: July 28, 2014 04:38 IST

शहरात नागरिकांना घराची दुरुस्ती करण्यासाठीही महापालिकेची परवानगी घेण्यास बांधकाम विभागाचे उंबरे झिजवावे लागतात

पुणे : शहरात नागरिकांना घराची दुरुस्ती करण्यासाठीही महापालिकेची परवानगी घेण्यास बांधकाम विभागाचे उंबरे झिजवावे लागतात. मात्र, महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम व्यावसायिकाने दोन वर्षे आधी बांधलेल्या पुलास एप्रिल २0१४ मध्ये घाईगडबडीने मान्यता देण्याचा प्रकार नुकत्याच झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत समोर आला आहे. याबाबत शहर सुधारणा समिती सदस्यांनी बांधकाम विभागाकडे बैठकीत विचारणा केली असता, नाला ही जिल्हा प्रशासनाची मालकी असल्याने त्यावर पुलाच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी नसल्याचे धक्कादायक उत्तर देण्यात आले. मात्र, परवानगीची आवश्यकता नव्हती तर दोन वर्षांनंतर परवानगी कशी देण्यात आली, याचा खुलासा मात्र प्रशासनास करता आला नसल्याची माहिती नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी दिली. धानोरी येथील स. नं. ४८ मध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या जागेकडे जाण्यासाठी नाल्यावर दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, या पुलास महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याबाबत म्हस्के यांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यानंतर एप्रिल महिन्यात या पुलास घाईगडबडीने मान्यता देण्यात आली आहे. याबाबत म्हस्के यांनी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करीत या प्रकाराबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली; मात्र कोणत्याही अधिकाऱ्यास उत्तर देता आले नाही. तसेच शहरातील नाल्यांची मालकी जिल्हा प्रशासनाची असल्याने त्यावर पूल बांधण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. गरज नव्हती तर याबाबत तक्रारी आल्यानंतर परवानगी दिली कशी, याचा काहीच खुलासा अधिकाऱ्यांना करता आला नाही. तसेच याबाबत माहिती नसल्याचे सांगत या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती देण्याचे आश्वासन अतिरिक्त नगर अभियंते विवेक खरवडकर यांनी दिले असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. (प्रतिनिधी)