शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षांना अटक होण्याची पहिलीच वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 05:08 IST

बॅँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके गैरव्यवहारप्रकरणी अटक केली.

पुणे : बॅँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके गैरव्यवहारप्रकरणी अटक केली. राष्ट्रीयकृत बँकेच्या अध्यक्षांना अटक होण्याची ही देशातील गेल्या ४० वर्षातील पहिलीच घटना असल्याचे फॉरेन्सिक आॅडिटर शेखर सोनाळकर यांनी सांगितले़ यापूर्वी हरिदास मुंदडा गैरव्यवहार गाजला होता़ त्यावेळी जीवन विमा कंपनीच्या (एलआयसी) चेअरमनना राजीनामा द्यावा लागला होता़बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवून ५० कोटी रुपये डीएसकेंच्या डीएसकेडीएल या कंपनीकडे वर्ग केले. तसेच कंपनीची परिस्थिती खराब असल्याचे माहीत असतानाही पुन्हा १० कोटींचे कर्ज देण्यात आले. तसेच ज्या कारणासाठी पैसे दिले त्याच कारणासाठी पैशाचा वापर झाला की नाही याबाबत चौकशी झालेली नाही. घाटपांडे यांनी लेखा परीक्षणात डीएसकेडीएल कंपनीची आर्थिक स्थिती मांडली मांडली असती तर ही वेळच आली नसती, असा युक्तीवाद अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात केला. महाराष्ट्र बँकेकडून मार्च २०१६ मध्ये मिळालेले हे पैसे ड्रीम सिटी योजनेसाठी न वापरता कर्जरोख्यांची देणी फेडण्यासाठी वापरण्यात आले़कर्ज वाटप केले त्यावेळी डीएसके यांच्या कर्मचाºयांचे पगार थकीत होते़ डिसेंबर २०१६ मध्ये २५९ कर्मचारी कंपनी सोडून गेले होते़ जानेवारी २०१७ पासून ठेवीदारांचे व्याजाचे व मुद्दलाचे धनादेश न वटता परत जात होते़ ठेवीदारांचे व्याज व मुद्दलाचे धनादेश महाराष्ट्र बँकेतून जात होते़ मार्च २०१७ पर्यंत एकूण १२२० धनादेश बाऊन्स झाले होते़, अशीही माहिती समोर आली आहे.दरम्यान कोणतीही चौैकशी न करता गुप्ता आणि मराठे यांना अटक करण्यात आल्याचा युक्तावाद बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :Arrestअटक