शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

बारामतीत प्रथमच आढळला ‘अजगर’

By admin | Updated: January 11, 2017 01:54 IST

जैनकवाडी परिसरातील नागरिकांना नेहमीच भलामोठा अजगर फिरताना दिसत होता. अजगर दिसला, की येथील रहिवाशांची भीतीने गाळन उडायची.

बारामती : जैनकवाडी परिसरातील नागरिकांना नेहमीच भलामोठा अजगर फिरताना दिसत होता. अजगर दिसला, की येथील रहिवाशांची भीतीने गाळन उडायची. तातडीने सर्पमित्रांना संपर्क साधला जायचा; परंतु सर्पमित्रांनाही या अजगराने दोन-तीन वेळा चकवा दिला. अजगर सापडतच नाही म्हटल्यावर रविहासीदेखील भीतीच्या सावटाखाली होते. मात्र येथील एका युवकाला हा अजगर दिसला. त्याने तातडीने सर्पमित्रांना याबाबत माहिती कळवली. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी या अजगराला पकडल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. बारामती शहराच्या जवळ भलामोठा अजगर पकडण्याची ही पहिलीच वेळ. ‘रॉक इंडियन पायथन’ जातीचा सुमारे ८ ते ९ फूट लांबीचा अजगर मागील अनेक दिवसांपासून जैनकवडी परिसरात फिरत असल्याचे येथील ग्रामस्थांनी पाहिले होते. जवळच असणाऱ्या भिगवण-बारामती रस्त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच परिसरातील रहिवाशीदेखील या अजगरामुळे भीतीच्या सावटाखाली होते. सोमवारी सायंकाळी ७च्या सुमारास अमित यादव हा युवक भिगवण रस्त्याने येत होता. बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या जवळच हा भलामोठा अजगर गारव्याला पहूडलेला आढळला. अमितने तातडीने बारामती शहरातील सर्पमित्रांशी संपर्क साधला. दोन-तीन वेळा चकवा दिल्याने सर्पमित्रांनीही तातडीने अजगर पडकण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. अजगराचा आकार पाहून सर्पमित्रदेखील चकित झाले. मात्र सर्पमित्रांचीही अजगर पकडण्याची पहिलीच वेळ असल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर अजगराला सुरक्षित पडकण्यात सर्पमित्रांना यश आले. यानंतर सर्पमित्रांनी तातडीने बारामती वनविभागाशी संपर्क साधून अजगर पकडल्याची कल्पना दिली. मंगळवारी (दि. १०) वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी पंचनामा केला. यानंतर सर्पमित्र अमोल जाधव, मांढरे, अक्षय झगडे, श्रीनाथ चव्हण, सुहास भोसले, कल्पक गाढवे, संग्राम थोरात, राहुूल सूळ, वनकर्मचारी डी.एम. वाघमोडे, आर.डी. काळोखे आदींच्या उपस्थितीत अजगराला सुरक्षित निर्जनस्थळी सोडण्यातआले. (प्रतिनिधी)अजगर हा पूर्णपणे बिनविषारी साप असून, त्याला इंग्लिश मध्ये ‘रॉक इंडियन पायथन’ असे म्हणतात. याची सरासरी लांबी १५ ते १८ फूट असते. याच्या स्थुल शरीरावर गुळगुळीत चमकणारे खवले, रंग राखाडी, पांढरट किंवा फिकट तपकिरी असतो.  शरीरावर गडद तपकिरी ठिपके असतात. याचे मुख्य खाद्य लहान असताना बेडूक, सरडे, उंदीर, पक्षी आणि मोठा झाल्यावर ससा, हरिण, बकरी असे मोठे प्राणी याचे खाद्य आहेत, अशी माहिती सर्पमित्र अमोल जाधव यांनी दिली.