शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवेचे पहिले पाऊल ‘अनधिकृत’

By admin | Updated: March 5, 2017 04:34 IST

महापालिका निवडणुकीत बाजी मारून पुणेकरांची सेवा करण्यासाठी नगरसेवक झालेल्या अनेक माननीयांनी महापालिकेत पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच अनधिकृत कामांना सुरुवात

पुणे : महापालिका निवडणुकीत बाजी मारून पुणेकरांची सेवा करण्यासाठी नगरसेवक झालेल्या अनेक माननीयांनी महापालिकेत पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच अनधिकृत कामांना सुरुवात केली आहे. निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी शहर व उपनगरांमध्ये ‘धन्यवाद’ची अनधिकृत फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे या माननीयांची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली आहे, याची जणू झलकच शहरभर पाहायला मिळत आहे.महापालिका निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे सर्व अनधिकृत राजकीय फ्लेक्स काढण्यात आले होते. निवडून आलेल्या नगरसेवकांनी सुरू केलेल्या फ्लेक्सबाजीने शहराची ‘कोंडी’ केली आहे. प्रमुख रस्ते, चौक, पूल, सिग्नल अशा ठिकाणी नगरसेवक तसेच काही पक्षांनी फ्लेक्स लावले आहेत. मतदारांनी भरभरून दिलेल्या मतरूपी प्रेमाबद्दल धन्यवाद देणारे हे फ्लेक्स झळकत आहेत. मतदारांना हात जोडून धन्यवाद देणारे नगरसेवक तसेच वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रेही या फ्लेक्सवर आहेत. नगरसेवकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे काही दिवस मोकळा श्वास घेणारे रस्ते, चौकांची या फ्लेक्सबाजीने घुसमट होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे भानही माननीयांना राहिले नसल्याचे दिसते. दिवसागणिक या फ्लेक्सच्या संख्येत वाढच होत आहे. एका नगरसेवकाचा फ्लेक्स लागल्यानंतर लगेचच दुसरा नगरसेवक किंवा कार्यकर्त्यांकडून फ्लेक लावले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत पुणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, अनधिकृत फ्लेक्सबाबत उच्च न्यायालयाने कारवाईबाबतचे पालिका व पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. तसेच यासाठी स्वयंशिस्त पाळण्याचीही गरज आहे.