शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला कोविड-१९ चे लसीकरण हे मोठे आव्हान असून, शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षांत जिल्हा प्रशासनाला कोविड-१९ चे लसीकरण हे मोठे आव्हान असून, शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात तब्बल एक लाख दहा हजार ४३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आरोग्‍य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरणे, लस साठवण क्षमता तयार करणे, यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले की, पुणे जिल्‍ह्यात २५३ शासकीय आरोग्‍य संस्‍था व खाजगी आरोग्‍य संस्‍था ८ हजार ८९ अशा एकूण ३ हजार ८४२ खाजगी व शासकीय संस्थांची संख्या आहे. यात शासकीय आरोग्‍य कर्मचारी २४ हजार ७३९ तर खाजगी आरोग्‍य कर्मचारी ८५ हजार ६९५ येवढे आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात प्रशासनाला एक लाख १० हजार ४३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस द्यावी लागणार आहे. या सर्व शासकीय व खाजगी संस्‍था तसेच त्‍या अंतर्गत येणाऱ्या आरोग्‍य कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन’ या पोर्टलवर भरण्‍यात येत आहे.

चौकट

या मोहिमेत पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना (शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्र तसेच खाजगी आरोग्य संस्था) यांना लसीकरण करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर संलग्‍न आजार असलेले रुग्ण व वयोवृद्ध यांचा समावेश करण्यात येईल व तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचा समावेश करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चौकट

असे होणार लसीकरण

-कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात २ हजार ५४६ लस टोचक नेमण्यात येणार.

-लसीकरणात प्रत्येकी २ डोस २८ दिवसांच्या अंतराने दिले जाणार.

-लस साठवणीसाठी १८५ आय.एल.आर. व १५७ डीफ्रीजर आहेत.