शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीपासून दहावीपर्यंत सोडला नाही पहिला नंबर

By admin | Updated: June 18, 2014 02:19 IST

क्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या पाठबळावर खराळवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन कलीम शेख हिने महापालिका शाळांतून प्रथम क्रमांक पटकाविला

पिंपरी : शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या पाठबळावर खराळवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील आफरीन कलीम शेख हिने महापालिका शाळांतून प्रथम क्रमांक पटकाविला. तिने उर्दू माध्यमातून ९४ टक्के गुण मिळविले. वर्गातील प्रथम स्थान पहिलीपासूनच अढळ ठेवत तिने दहावीतही बाजी मारली. आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू स्कूलची आफरीन विद्यार्थिनी आहे. दहावीत असताना पहाटे चारला तिचा दिवस सुरू होत असे. सकाळी ७ पर्यंत आणि रात्री दोन तास अभ्यास असा तिचे अभ्यासाचे वेळापत्रक होते. शाळेतील अतिरिक्त वर्गाचा तिला लाभ झाला. सकाळच्या तीन तासांच्या वर्गात तिने तुलनेने कठीण विषयाची उत्तम तयारी केली. महापालिका शाळांतून प्रथम आल्याची बातमी शिक्षकांकडून समजताच पालकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. शास्त्र हा तिचा आवडीचा विषय असून, संशोधन क्षेत्रात करीअर करण्याचा तिचा मनोदय आहे. तसेच, प्राध्यापिका होऊन ज्ञानदानाचे काम करण्यास तिची पसंती आहे. गोष्टीची पुस्तके वाचणे हा तिचा छंद असून, डिस्कव्हरी चॅनल ती आवडीने पाहते. टीव्हीवरील पाककृतीचे कार्यक्रम पाहून ते स्वत: बनविण्याची तिची खुबी आहे. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने प्रथम स्थान मिळविले होते. वक्तृत्व स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक मिळविला होता. शालेय क्रीडा स्पर्धेतही ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते. तिचे वडील कलीम यांचे खराळवाडीत केशकर्तनाचे भाड्याचे दुकान आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील बहारीपूरचे (जिल्हा जौनपूर) असलेले शेख कुटुंब ३५ वर्षांपूर्वी कामधंद्याच्या शोधात शहरात आले. रस्ता रुंदीकरणात त्यांचे दुकान गेले. तरीही न खचता कलीम हे पाल्यांस शिक्षण देत आहेत. आफरीनची बहीण नर्गीस त्याच शाळेत नववीला आहे. भाऊ इरफान डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाला. लहान भाऊ तौफिक एच. ए. स्कूलमध्ये तिसरीला आहे. आफरीनने असेच यश मिळवावे, ही मनापासून इच्छा होती. ती पूर्ण झाली. अल्लाने माझी दुवा कबूल केली, असे गृहिणी असलेल्या आई शहनाज यांनी अतीव आनंदाने सांगितले. आफरीन मात्र या गुणांवर समाधानी नसून, तिला ९६ ते ९८ टक्के गुणांची अपेक्षा होती. सायबर कॅफेत निकाल पाहून ती रडत होती. मात्र, नंतर स्वत:ला सावरत तिने पेढे वाटत आनंद साजरा केला.(प्रतिनिधी)