शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पहिल्या अश्वरिंगणाने पारणे फेडले

By admin | Updated: June 25, 2017 04:30 IST

येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठू नामाचा गजर करत सोपानकाका पालखी सोहळयातील पहिले अश्वरिंगण पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : येथे आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठू नामाचा गजर करत सोपानकाका पालखी सोहळयातील पहिले अश्वरिंगण पार पडले. ‘सोपानकाका चरणी, ‘अश्व धावताच रिंगणी’ हजारो भाविकांच्या उपस्थीत पालखीतील पहील्या अश्व रिंगणाने उपस्थितींच्या डोळयांचे पारणे फेडले. काल रात्रीचा निंबुतचा मुक्काम उरकून हा सोहळा सोेमेश्वरनगरच्या दिशेने रात्रीच्या मुक्कामासाठी झेपावला. सकाळी आठ वाजता निंबुत छप्री येथे हा सोहळा सकाळच्या चहा पानासाठी विसावला. याठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे, पुणे जिल्हा कृषी संघाचे माजी उपाध्यक्ष गौतम काकडे, तानाजी काकडे, शिवाजी लकडे, सतिश दगडे, शिवाजी दगडे, आप्पासो काळे यांनी पालखीचे स्वागत केले. दीड तासाच्या विसाव्यानंतर हा सोहळा सकाळी अकरा वाजता दुपारच्या न्याहरीसाठी वाघळवाडी येथे विसावला. या ठिकाणी सरपंच राजेंद्र काश्वेद, उपसरपंच विजय गायकवाड, माजी उपसरपंच गणेश जाधव, महादेव सावंत, विठ्ठल गायकवाड, माजी सरपंच सतिश सकुंडे, आनंदराव सावंत, कल्याण तुळसे, प्रविण सकुंडे, किरण गायकवाड, किसन सकुंडे, हेमंत गायकवाड, ग्रामसेवक डि. टी. होळकर आदी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी पंचायत समिती सदस्या निता फरांदे, मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, महेश काकडे, लालासाहेब माळशिकारे, लक्ष्मण गोफणे, शांताराम कापरे, मोहन जगताप, अ‍ॅड, महेश राणे, बाळासाहेब गायकवाड, शेखर खंडागळे, कार्यकारी संचालक सुरेश तावरे, विक्रम भोसले, डॉ. मनोज खोमणे, राजू धुर्वे, आदी उपस्थीत होते. पालखीबरोबर विश्वस्त गोपाळ महाराज गोसावी, पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत महाराज गोसावी, गजानन महाराज गोसावी, चोपदार मनोज रणवरे व हरीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रींगणाचा सोहळा पार पडला. दरवर्षीप्रमाणे राजश्री जुन्नरकर हीने संपुर्ण रिंगणाला रांगोळी काढली होती. त्यांनतर सायंकाळी सहा वाजता पालखी मुक्कामासाठी कारखान्याच्या छत्रपती मैदानावर विसावली. सोमेश्वर आणि बारामती मेडीकल असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना २० हजार रूपयांच्या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेखर कदम, शेखर जगताप, सचिन कारंडे, प्रविण कोंडे, धनंजय चव्हाण, सचिन सोरटे आदी उपस्थीत होते. कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.