शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार

By admin | Updated: April 20, 2015 04:29 IST

जेवणाची आॅर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून अमोल तुकाराम भालेकर (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) या हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला

पिंपरी : जेवणाची आॅर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून अमोल तुकाराम भालेकर (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) या हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना देहू-तळवडे रस्त्यावरील शिवरत्न हॉटेल येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर झालेल्या झटापटीत अमोल यांचे बंधू विशाल यांच्याही डोक्याला किरकोळ जखम झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दत्तात्रय वाळके (रा. म्हाळुंगे) याला अटक केली असून, तिघेजण अद्यापही फरार आहेत. पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिलेली माहिती अशी : भालेकर यांचे देहू-तळवडे रस्त्यावर शिवरत्न नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री वाळके व त्याचे साथीदार येथे जेवणासाठी आले होते. दरम्यान, चौघांपैकी एकाने अमोल यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या पायाला लागली. तसेच या वेळी झटापटीत अमोल यांचे बंधू विशाल यांच्याही डोक्याला किरकोळ जखम झाली. जखमी अवस्थेतील अमोल यांना सुरुवातीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांना एक पुंगळी सापडली आहे. मात्र, पिस्तूल अद्याप हाती लागलेले नाही. तसेच या हल्ल्यात वापरलेली दोन वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींबाबत सर्व माहिती मिळाली असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, असे वाघमोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)