शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यावर भरदिवसा गोळीबार

By admin | Updated: December 23, 2015 00:15 IST

दहशतीच्या जोरावर शहरात उच्छाद मांडलेल्या गुन्हेगारांची मजल आता थेट पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. सिग्नलला उभे असताना एकाच्या कंबरेला पिस्तूल दिसल्यामुळे

पुणे : दहशतीच्या जोरावर शहरात उच्छाद मांडलेल्या गुन्हेगारांची मजल आता थेट पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेली आहे. सिग्नलला उभे असताना एकाच्या कंबरेला पिस्तूल दिसल्यामुळे पाठलाग करीत त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसावर भरदिवसा भरवस्तीत गोळी झाडण्यात आल्याची घटना डेक्कन भागात मंगळवारी संध्याकाळी घडली. सुदैवाने हा पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला. त्याच्या बुटाला गोळी लागली. सुट्टीवर असतानाही आपल्या धैर्याची चुणूक दाखवणाऱ्या पोलिसाचे कौतुक होत आहे. मयूर राजेंद्र भोकरे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयूर भोकरे शिवाजीनगर न्यायालयातील सुरक्षा पथकामध्ये नेमणुकीस आहेत. परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरे आणि त्यांचा मित्र संदेश खडके हे दोघेही बालगंधर्व रंगमंदिराजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर भवनमध्ये कामानिमित्त गेले होते. तेथून साई सर्व्हिस स्टेशनसमोरून जात असताना त्यांना दुचाकीवरून जाणारे दोघे दिसले. त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाचा शर्ट वर सरकल्यामुळे कंबरेला लावलेले पिस्तूल भोकरे यांच्या नजरेस पडले. त्यांनी याबाबत त्या दोघांना हटकले असता आरोपींनी पळ काढला. भोकरे यांनी खडकेच्या मदतीने दुचाकीवरून दोघांचा पाठलाग सुरू केला. त्यांना चुकविण्यासाठी आरोपी डेक्कनकडील गल्लीबोळात घुसले. आपटे रस्त्यावरच्या १०१६ पाटील बंगला परिसरातील एका बोळात आरोपींपाठोपाठ भोकरेही घुसले. बोळ पुढे बंद असल्यामुळे एकाला भोकरेंनी पकडले. त्यांच्यामध्ये झटापट सुरू असतानाच एकाने गावठी कट्ट्यामधून एक गोळी झाडली. ही गोळी खालच्या दिशेने गेल्यामुळे बुटाला घासून गेली. त्यानंतरही त्यांनी आरोपीला पकडून ठेवले होते. मात्र भोकरेंच्या पोटाला पिस्तूल लावल्यामुळे त्याला सोडावे लागले आणि दोघेही पसार झाले. त्यानंतर लगेचच सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी, वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी घटनास्थळी धाव घेतली.