शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘भाई’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कारागृहाबाहेर आतषबाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

येरवडा : ‘भाई’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार ...

येरवडा : ‘भाई’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

खून-मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार आकाश कंचिले याच्या वाढदिवसानिमित्त येरवडा जेलबाहेर त्याच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. एवढ्यावरच न थांबता या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेमुळे परिसरातील भाईंच्या टोळ्यांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. येरवड्यातील गुन्हेगारी टोळ्यांची वाढती संख्या, त्यामुळे परिसरात गुन्हेगारी यावर पोलिसांनी अंकुश ठेवणे आवश्यक आहे.

आकाश कंचिले याच्यावर खून, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊन काळात येरवडा जेलमधून सुटलेल्या नितीन कसबे याचा शादलबाबा चौकात अवघ्या काही तासांत आकाश कंचिले व त्याच्या टोळीतील सदस्यांनी अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून तो या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये आहे.

येरवडा परिसरात असणारे त्याच्या समर्थकांची अजूनही दहशत आहे. शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी त्याचा वाढदिवस होता. त्याच्या समर्थकांनी येरवडा जेलबाहेरील एअरपोर्ट रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी केल्याचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावरून व्हायरल केला आहे. एवढेच नाही तर ‘किंग ऑफ येरवडा’ असे इतर व्हिडीओदेखील तयार करून व्हायरल केलेले आहेत. एकंदरीतच या भाई समर्थकांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. आपल्या टोळीचे वर्चस्व दाखवण्यासाठी गुन्हेगार व त्यांचे समर्थक अशा प्रकारे सोशल मीडियाचा सर्रास वापर करत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या वातावरणाखाली आहेत. अशा घटनांमुळे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.