शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अग्निशामक दलाचा गुरुवार ठरला ‘युद्धाचा’

By admin | Updated: February 26, 2016 04:25 IST

शहरामध्ये गुरुवारी दिवसभरात अग्निशामक दलाला विविध प्रकारच्या १४ वर्दी मिळाल्या. कुठे आग-तर कुठे कचरा पेटल्याचे, कुठे पक्षी-तर कुठे प्राणी अडकल्याचे ‘कॉल’ मिळताच

पुणे : शहरामध्ये गुरुवारी दिवसभरात अग्निशामक दलाला विविध प्रकारच्या १४ वर्दी मिळाल्या. कुठे आग-तर कुठे कचरा पेटल्याचे, कुठे पक्षी-तर कुठे प्राणी अडकल्याचे ‘कॉल’ मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य केले. पहाटे कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीजवळ तसेच दत्तवाडी येथील एका पत्राशेडला लागलेल्या आगीत वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जर्मन बेकरीजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावरच्या दुकानांमधून पहाटे धूर येऊ लागला. याची माहिती मिळताच येरवडा आणि नायडू अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी रवाना झाले. जवानांनी तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर येरवड्यातील गोल्फ क्लब चौकामध्ये एका चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची वर्दी मिळाली. जवानांनी वाहनाला लागलेली आग विझवली. स्टेशन अधिकारी रमेश गांगड व विजय भिलारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. दलाचे अधिकारी राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी कामगिरी बजावली. पुणे स्टेशन परिसरातील कैलास स्मशानभूमीजवळच्या लाकडांच्या साठ्याला आग लागली होती. तर, उंड्री येथील पाण्याच्या टाकीजवळील प्लॅस्टिक गोडाउनला सकाळी आग लागली होती. तर, धनकवडी येथील राजर्षी बँकेजवळच्या ट्रान्सफॉर्मरला आणि लष्कर भागातील एम. जी. रस्त्यावरच्या एका इमारतीतील मीटर बॉक्सला आग लागली होती. गेल्या काही दिवसांत आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. दत्तवाडीमधील लायन्स क्लबजवळ एका मोठ्या पत्राशेडला गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच एरंडवणा अग्निशमन केंद्रातील बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. सजावटीकरिता लागणाऱ्या साहित्याच्या साठ्याला आग लागल्यामुळे धुराचे लोट उठत होते. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.