शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सूस येथे आगीत दोन दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

पुणे : सूस येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक गादी कारखाना, एक गॅरेज भस्मसात झाले. हे घटना शनिवारी (दि ...

पुणे : सूस येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक गादी कारखाना, एक गॅरेज भस्मसात झाले. हे घटना शनिवारी (दि १३) सकाली ११ वाजता घडली. स्थानिक तरुणांनी तातडीने टँकर बोलावत, तसेच पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले.

सूस येथे ज्ञानेश्वर कृष्णा चांदेरे यांचे कुलस्वामिनी गादी कारखाना, तसेच बाजूला एक गॅरेज आहे. शनिवारी ११ वाजता गादी कारखान्यात काम सुरू असताना शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. कारखान्यात असलेल्या कापसामुळे आगीने लगेच उग्र रूप धारण केले. स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने दोन टँकर मागवले. दरम्यान, पाषाण येथील पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन केंद्रालाही ही माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात पालिकेचा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. माजी सरपंच नारायण चांदेरे, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली. थोड्याच वेळात पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस हवालदार व्ही.एल. राठोड पुढील तपास करत आहेत.

चौकट

...तर मोठी दुर्घटना झाली असती

गादी कारखान्याच्या शेजारी एच.पी. गॅस एजन्सी आहे. या ठिकाणी सिलिंडर असतात. मात्र, स्थानिक तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सिलिंडर बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

चौकट

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

ही दोन्ही दुकाने गावातील मुख्य रस्त्यालगत आहेत. अचानक आग लागल्याने येथील वाहतूक खोळंबली. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास दोन तास वाहतूककोंडी झाली होती. पोलीस हवालदार व्ही.एल. राठोड आणि इतर पोलीस कर्मचारी आणि स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत केली.

- सूस येथे आगीत भस्मसात झालेला गादी कारखाना आणि गॅरेज.