शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बिबवेवाडी येथे पत्र्यांच्या दुकानांना भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:23 IST

सुदैवाने जीवितहानी नाही : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भडका

बिबवेवाडी : येथील शिवतेजनगरशेजारील ओमकारनगर येथे मोकळ्या जागेत असलेल्या तीन पत्र्यांच्या दुकानांना सकाळी साडेसात वाजता भीषण आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या वेळी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

आग लागल्याची माहिती कळताच कात्रज केंद्र व कोंढवा केंद्रातून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या व देवदूत या आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन गाड्या आल्यानंतर ही आग विझविण्यात आली. या वेळी अग्निशामक दलाचे तांडेल तळेकर व जवान जागडे, घडशी, मांगडे, लबडे, जरे, इंगळे व तांगुरे यांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविली व परिस्थिती नियंत्रणात आणली.

बिबवेवाडी येथील ओमकारनगर येथील मोकळ्या जागेवर असलेल्या या दुकानामध्ये एक दुकान मसाला गिरणीचे, दुसरे लाकडी फळ्या कापण्याचे व तिसरे दुकान हे भंगारमालाचे होते. येथील नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या वेळी लावलेल्या शेकोटीमुळे ही आग पसरली. भंगारमालाच्या दुकानाला लागली; त्यानंतर त्याच्याशेजारीच असलेल्या मसाला गिरणीच्या दुकानामध्ये आग पसरली व त्याच दुकानात असलेल्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. त्यानंतर लाकडी फळ्या कापण्याच्या दुकानाला लागली.दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान४या आगीमध्ये तिन्ही दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. या आगीच्या दुर्घटनेत श्रीराम महिला लघु गृह उद्योग या मसाला गिरणीचे अंदाजे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मसाला गिरणीचे मालक कसबे यांनी सांगितले. तसेच, चंद्रकांत प्लायवूड या लाकडी फळ्या कापण्याच्या कारखान्याचे अंदाजे नुकसान तीन लाख रुपये इतके झाले आहे, असे या दुकानाचे मालक चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितले व भंगारमालाचे दुकान असलेल्या शफी मोमीन यांचे यामध्ये दीड लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दल