शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इमारत तपासणीचा अधिकार अग्निशमन केंद्रप्रमुखांना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 01:23 IST

अग्निशमन दलाकडून इमारतींच्या बांधकामासाठी दिले जाणारे ना हरकत प्रमाणपत्र, इमारतींची तपासणी करणे, नो ड्युज आदी अधिकार फायर अ‍ॅक्टनुसार केवळ

पुणे : अग्निशमन दलाकडून इमारतींच्या बांधकामासाठी दिले जाणारे ना हरकत प्रमाणपत्र, इमारतींची तपासणी करणे, नो ड्युज आदी अधिकार फायर अ‍ॅक्टनुसार केवळ ‘डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग’ हा कोर्स केलेल्या अधिकाऱ्यांनाच आहे. महापालिकेतील अग्निशमन केंद्रप्रमुखांचा हा कोर्स झालेला नसल्याने त्यांना इमारतींची तपासणी तसेच ना हरकत प्रमाणपत्र देता येणार नाही, असा अभिप्राय मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी आयुक्तांना दिला आहे. इमारतींची माहितीच नसेल आगीच्या दुर्घटनेवर नियंत्रण कसे मिळवायचे, असा प्रश्न केंद्रप्रमुखांकडून उपस्थित करण्यात आला आहे.शहरातील ३६ मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना ना हरकत परवाना देण्याचे अधिकार केंद्रप्रमुखांकडे वर्ग करण्यात यावेत, अशी सूचना एक महिन्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केली होती. आयुक्तांपुढे याबाबतचा प्रस्ताव मांडून त्याची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य अग्निशमन प्रमुखांनी फायर अ‍ॅक्टनुसार केंद्रप्रमुखांना असे अधिकार देता येत नसल्याचा अभिप्राय दिला आहे.याबाबत प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, ‘फायर अ‍ॅक्टनुसार ज्या अधिकाऱ्यांचा डिओचा कोर्स झाला आहे, त्यांनाच इमारत तपासणीचे तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देता येऊ शकणार आहेत. डिओच्या कोर्समध्ये त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जात असल्याने त्यांनाच हा अधिकार देण्यात यावा, असे फायर अ‍ॅक्टमध्ये नमूद केले आहे, त्याबाबतचा अभिप्राय आयुक्तांना देण्यात आला आहे.’अग्निशमन दलाकडून शहरातील इमारतींना १९९० पासून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आतापर्यंत २५ हजारपेक्षा जास्त इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिले गेले आहेत. १५ मीटरखालील इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देणे, त्यांची तपासणी करण्याचे काम गेल्या ८ वर्षांपासून केंद्रप्रमुखांकडून केले जात आहे.केंद्रप्रमुखांना अधिकार दिल्यामुळे बांधकामांना तातडीने परवाने मिळू शकतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. याबाबतचा अंतिम निर्णय आता आयुक्तांकडून घेतला जाणार आहे.