शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आगप्रतिबंधक सुविधा कागदावरच

By admin | Updated: November 11, 2016 01:58 IST

महापालिकेने शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासाठी काढलेली निविदा वर्ष होत आले तरी अद्याप कागदावरच आहे.

पुणे : महापालिकेने शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासाठी काढलेली निविदा वर्ष होत आले तरी अद्याप कागदावरच आहे. कोल्हापूर येथे एका शाळेला नुकत्याच लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाची ही बेपर्वा वृत्ती दिसत आहे. लाखभर विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्यामुळे धोक्यात आहे. राज्य सरकारने प्रत्येक शाळेत आग प्रतिबंधक उपकरणे असणे काही वर्षांपूर्वी बंधनकारक केले आहे. त्याचाच आधार घेत सुमारे ३ वर्षांपूर्वी महापालिकेने शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी आगप्रतिबंधक उपकरणे खरेदी करण्याची निविदा काढली. आग विझवताना वापरण्याचे सिलिंडर त्यात खरेदी केले गेले. काही शाळांमधील शिक्षक व काही विद्यार्थ्यांना पालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने ही उपकरणे कशी वापरायची याचे प्रशिक्षणही दिले गेले. विशिष्ट मुदतीत ही सिलिंडर्स वापरली गेली नाहीत तर निकामी होतात. त्यामुळेच दरवेळी असा खर्च करण्याऐवजी पाण्याची टाकी, बुस्टर पंप, मोठा पाईप, त्याला नोझल अशी हायड्र्ंट यंत्रणा (आग लागलीच तर त्यावर या यंत्रणेचा वापर करून लगेचच पाण्याचा मारा करता येतो.) प्रत्येक शाळेत बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अंदाजपत्रकात २ कोटी ३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. महापालिका शिक्षण मंडळाने त्यातील ६६ लाख रुपये द्यायचे असेही ठरले. ते वर्गीकरण व्हायच्या आतच निविदा काढण्यात आली. या निविदेला काही कंपन्यांचा प्रतिसादही मिळाला. नियमाप्रमाणे त्यातील कमी किंमत दर्शविलेल्या कंपनीला हे काम देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र या प्रक्रियेला आता वर्ष होत आले तरीही पुढे काहीच झालेले नाही. सुरुवीताला १२० इमारतींमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार होती. दरम्यान, पालिकेच्या शाळांमध्ये बसविलेले आगप्रतिबंधक सिलिंडर्स त्यांची मुदत संपल्यामुळे काही ठिकाणी निकामे झाले आहेत. अनेक शाळांमध्ये असे सिलिंडर्स ठेवण्यासाठी जागाही नव्हती. त्यामुळे अशा शाळांनी ते ठेवलेच नाहीत. ज्यांनी ते ठेवले त्यांनी नंतर कधी त्याकडे पाहिलेच नाही. त्यामुळे त्यांची मुदत संपून गेली तरीही ते जागेवरच आहेत. सिलिंडर्स बदलावेत असे कोणालाही वाटले नाही. ज्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले ते आता शाळेतही नाहीत.