शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक कंपनीला आग

By admin | Updated: April 15, 2016 03:34 IST

कांदळी (ता. जुन्नर) येथील जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमधील ओंकार प्लॅस्टिक इंडस्ट्रीजच्या दोन प्रकल्पामध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

नारायणगाव : कांदळी (ता. जुन्नर) येथील जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमधील ओंकार प्लॅस्टिक इंडस्ट्रीजच्या दोन प्रकल्पामध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. औद्योगिक सहकारी वसाहतीतील विलास सखाराम बोऱ्हाडे यांच्या बी-१८ मधील ओंकार इंडस्ट्रीत प्लॅस्टिक दाणे; तसेच कागद बनविले जातात, तर रोहिणी एकनाथ बाम्हणे या बी-१४ मधील ओंकार प्लॅस्टिक इंडस्टीज ताडपत्री बनविले जाते. बुधवारी रात्री १०च्या सुमारास ओंकार इंडस्ट्रीजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग एवढी तीव्र होती की, शेजारील ओंकार प्लॅस्टिक इंडस्ट्रीज या कंपनीला ही आग लागल्याने दोन्ही कंपन्यांचे लाखो रुपयांचे प्लॅस्टिकचे साहित्य जळाले. आग लागल्याचे कळताच जुन्नर तालुका चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित बेनके यांनी जुन्नर नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठवली; तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस विभागीय अधिकारी जयश्री देसाई, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, युवानेते अतुल बेनके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.आग आटोक्यात आणण्यासाठी जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे राजकुमार चव्हाण, अतिब तिरंदाज, औद्योगिक सहकारी वसाहतीतील सचिव पडवळ आणि परिसरातील ग्रामस्थ, कामगार यांनी मध्यरात्री ३ पर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीत सुमारे ३० ते ४० लाखांचे नुकसान झाले.