शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कपड्याच्या दुकानाला आग

By admin | Updated: January 10, 2017 03:41 IST

येथील केसनंद फाटा परिसरामध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या दुकानाला आग लागून जवळपास पाच हजार साड्या

वाघोली : येथील केसनंद फाटा परिसरामध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या दुकानाला आग लागून जवळपास पाच हजार साड्या, ब्लँकेट व इतर कपडे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.वाघोली येथील केसनंद फाटा परिसरामध्ये संतोष कलेक्शन नावाने दुकान आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या या दुकानाच्या मागच्या बाजूने धूर येत असल्याचे एका महिलेला दिसले. यानंतर तत्काळ दुकानमालक चंपालाल शेठीया यांना कळविण्यात आले. दुकान उघडून पाहिले असता मागच्या खोलीमध्ये आग लागली होती. याबाबत अग्निशमन दलाला याची माहिती देऊन आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. आगीमुळे इमारतीचा स्लॅब गरम झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानावरील रहिवाशांनी सिलिंडरसह इतर वस्तू घराच्या बाहेर काढल्या. अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यानंतर तत्काळ आग आटोक्यात आणली. आग लागल्याचे वेळीच समजल्याने दुकानाचा मुख्य भाग आगीपासून वाचला. आग लागलेल्या खोलीमध्ये ठेवलेल्या साड्या, ब्लँकेट व इतर कपडे जळून खाक झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.