शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अग्निशामक दलांना महिलांचे ‘वावडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:05 IST

स्त्रीवादी चळवळी आणि पुरोगामित्वाचा डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व अग्निशामक दलांना अद्यापही महिलांचे ‘वावडे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे.

- लक्ष्मण मोरेपुणे : स्त्रीवादी चळवळी आणि पुरोगामित्वाचा डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व अग्निशामक दलांना अद्यापही महिलांचे ‘वावडे’ असल्याचे वास्तव समोर आले आहे. मुंबई वगळता एकाही महापालिकेने अथवा नगर परिषदेने अग्निशामक दलांमध्ये महिलांची भरतीच केलेली नसल्याने शासनाच्या ३० टक्के महिला नोकरभरतीच्या आदेशालाच हरताळ फासला गेला आहे.मुंबईपाठोपाठ पुणे, नवी मुंबई, ठाणे, नागपूर या मेट्रो शहरांसोबतच औरंगाबाद, नाशिकसारख्या मोठ्या शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. यासोबतच उद्योगधंद्यानिमित्त स्थलांतरित होणाºयांमुळे या शहरांची लोकसंख्या वाढत चालली आहे. महत्त्वाच्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या कक्षाही विस्तारत चालल्या आहेत. ज्यातुलनेत या शहरांचा विस्तार होत आहे; त्यातुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या वाढताना दिसत नाही.पोलीस, महापालिका, महसूल विभाग, लष्करासह सर्वच क्षेत्रांत महिला सामान्य कर्मचारी ते उच्च पदांवर काम करीत आहेत. राज्यातील महापालिकांमध्ये महिला महापौर, नगराध्यक्षांसह नगरसेविकांचे प्रमाण लक्षणीय आहे. यासोबतच महिला आमदार व खासदारांची संख्याही लक्षणीय आहे. मुंबई महापालिकेने अग्निशामक दलामध्ये ६ वर्षांपूर्वी महिला भरतीचा प्रयोग केला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. परंतु, दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाला प्रतिसाद लाभला. सध्या मुंबई अग्निशामक दलामध्ये १२० महिला कर्मचारी पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. मात्र, उर्वरित २१ महापालिका, २५० नगर परिषदा व १२९ नगरपंचायतींनी महिलांची भरती केलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे अध्यक्ष प्रभात रहांगदळे यांनी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी अग्निशामक दलांमधील महिलांची पदे भरली पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे.>मुंबई महापालिकेने धोरण तयार करून महिलांची अग्निशामक दलात भरती केली. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने पुरुषांसाठी असलेल्या फायरमन व तत्सम प्रशिक्षणासाठी महिलांना प्रवेशदेण्याचे धोरण निश्चित केले आहे. फक्त पुरुषांनाच हे कोर्सेस करतायेत होते. यापुढे महिला हे कोर्सेस करू शकणार आहेत. मुंबई वगळता राज्यातील अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने अग्निशामक दलात महिलांची भरती केलेली नाही. वास्तविक, ३० टक्क्यांच्या निकषानुसारही भरती करणे आवश्यक आहे.- प्रदीप रहांगदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, म. रा.

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दल