शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा

रहाटणी : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा बलुतेदार गाव सोडून शहरात दाखल होत आहेत. मात्र, या ठिकाणीही त्यांना त्यांचे काम सोडून इतर कामे करावी लागत आहेत. पारंपरिक व्यवसाय ग्रामीण भागात चालत नसल्याने अनेक कारागीर शहराच्या वाटा धरल्या. परंतु, या ठिकाणीदेखील या कामाची वानवा असल्याने अनेकांना इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. कालांतराने हे पारंपरिक व्यवसाय कालबाह्य होतात की काय, अशी शंका काही कारागीर व्यक्त करीत आहेत. उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांनी गाव सोडून इतरत्र भटकंती सुरू केली. मात्र, सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने अनेकांनी शहर गाठले. मात्र, शहरात या व्यवसायांना थारा नसल्याने काहींना इतर कामे करावी लागत आहेत, तर काही जमेल तसे आपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दिवसभर काम नाही मिळाले की, त्यांच्यावर अन्नासाठी भटकंती करण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी हे लोक पैसे मागत हिंडत असतात. काही जण गावाकडे जाण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी करत असतात. नेमके हे लोक शहरात कामासाठी येतात, पण त्यांना लवकर काम मिळत नाही. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खंगल्याने शहरातही त्यांना कामासाठी भटकावे लागते.(वार्ताहर)