शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो कारशेडचा प्रश्नमार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे माण येथील कारशेडचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे माण येथील कारशेडचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी गुरुवार (दि.1) रोजी तब्बल 60150 चौमी क्षेत्राचा पीएमआरडीए व महामेट्रो यांचे उपस्थित अधिका-यांना दिला. सदर प्रक्रिया हिंजवडी पोलीसस्टेशन यांचेकडील बंदोबस्तात शांततेत पार पडली.

पीएमआरडीए’कडून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वावर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी टाटा-सिमेन्स यांच्यासोबत करार झाला असून, करारानुसार ’पीएमआरडीए’ने या प्रकल्पासाठी आवश्यक जागा टाटा-सिमेन्सला ताब्यात देणे आवश्यक होते. माण येथील कारशेडच्या जागेबाबत विरोध असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. आता हा अडथळा दूर झाला असल्याचे संदेश शिर्के यांनी सांगितले.

या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडची जागा 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) आरक्षित करण्यात आली होती. हे आरक्षण बदलून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी देण्याची कागदोपत्री प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनातील अडचणी दूर झाल्या आहेत. या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जागांपैकी यशदा आणि वाडिया महाविद्याालयांच्या आवश्यक जागांचा ताबाही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

----

जिल्ह्यात भूसंपादनाचा "देशमुख पॅटर्न "

पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प केवळ भूसंपादन वेळेवर होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. परंतु पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डाॅ.राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. पुण्याचा रिंगरोड, मेट्रो, राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे असो की पालखी मार्ग, चांदणी चौकातील ब्रीज, नवले ब्रीज परिसरातील रस्ता, या ठिकाणी असलेले भूसंपादनाचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या सहाच महिन्यात प्रचंड गती दिली. देशमुख दर आठवड्याला संबंधित सर्व भूसंपादन अधिकारी व प्रकल्पांचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतात. या बैठकीत एका आठवड्यात झालेली कामाची प्रगती, काही अडचण असल्यास ती कशी दूर करता येईल यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढला जातो. यामुळेच सध्या पुण्यात भूसंपादनचा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचा " देशमुख पॅटर्न " ची चांगलीच चर्चा आहे.