शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नवव्या दिवशी पाचंगेंचे उपोषण मागे

By admin | Updated: May 11, 2017 04:11 IST

शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांचे आमरण उपोषण सुरू होते. तब्बल आठ दिवस उलटूनही शासनदरबारी मागण्या मान्य करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली केल्या जात नव्हत्या. त्यामुळे पाचंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या आंदोलकांमधून चिडीची भावना व्यक्त होत होती. अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी (दि. ९) रात्री उशिरा आमदार सुरेश गोरे यांनी आंदोलनस्थळी पाचंगे यांची भेट घेतली. शेतकरीहिताच्या असलेल्या प्रमुख ११ कलमी मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आपली विशेष तातडीची बैठक आयोजिली जाईल, अशा आशयाचे लेखी पत्र पाचंगे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पाचंगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राम गावडे, विजय शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, मधुकर शिंगाडे, दीपाली शेळके, बाळासाहेब शेळके, शिवाजी मांढरे, उमेश मोरे, सुहास मलगुंडे, नामदेव गोडसे, भूदेव शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली शेळके यांनी आभार मानले.