शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पुणे शहराला मिळाले आरोग्यप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:04 IST

शहराला तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने पूर्णवेळ आरोग्यप्रमुखांची नियुक्ती केली आहे.

पुणे : शहराला तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने पूर्णवेळ आरोग्यप्रमुखांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या आरोग्य विभागातील मलेरियाचे सहायक संचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १० दिवसांत शहराला आरोग्य प्रमुख देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार अखेर शासनाने महापालिकेची ही मागणी पूर्ण केली आहे.शहरात सध्या डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिय या साथीच्या आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पुणेकर नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या महापालिकेकडे शहरासाठी आरोग्यप्रमुख नसल्याने हेळसांड होत आहे. यामुळे शहराला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख द्यावा, यासाठी विविध संस्थांच्या वतीने, विरोधी पक्षांनी अनेक वेळा महापालिकेत आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य सभेमध्येदेखील सदस्यांनी आरोग्यप्रमुख मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनेक वेळा लेखी निवेदन देऊन आरोग्यप्रमुख देण्याची मागणी केली होती. यासाठी महापालिका प्रशासनाने तीन वेळा विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रस्ताव मागविले होते; परंतु पुणे शहराच्या आरोग्यप्रमुखासाठी आवश्यक असलेली पात्रता असलेला एकही अर्ज आला नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनदेखील हतबल झाले होते. अखेर शासनाने महापालिकेची मागणी मान्य केली असून, शासनाने संचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांची आरोग्यप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. हंकारे यांनी आतापर्यंत शासनाच्या आरोग्य विभागात विविध पदांवर काम केले आहे. यामध्ये सातारा, सांगली जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली महापालिकेचे आरोग्यप्रमुख म्हणूनदेखील काम केले आहे. सध्या कोल्हापूर परिमंडळाचे सहायक संचालक, मलेरिया म्हणून ते कार्यरत आहेत.