शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ३० टँकरला मंजुरी; पण अद्याप सुरू नाहीत!

By admin | Updated: May 3, 2017 02:04 IST

गेला महिनाभर बारामती, आंबेगाव, भोर व जुन्नर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असताना फक्त पुरंदर तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात

पुणे : गेला महिनाभर बारामती, आंबेगाव, भोर व जुन्नर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असताना फक्त पुरंदर तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात आले होते. टंचाईच्या बैठकांमध्ये टँकरची मागणी झाल्यानंतर आता ३० टँकरला मंजुरी मिळाली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी प्रत्यक्षात गावात अद्याप टँकर गेलाच नसल्याची वास्तव स्थिती आहे. २३ गावे व २४५ वाड्या-वस्त्यांसाठी ६८ हजार ३६५ लोकसंंख्येला या ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यात पुरंदरमध्ये सुरुवातीला ९ टँकर होते, त्यांची संख्या आता १२ झाली असून बारामतीत ८, आंबेगावमध्ये ५, भोरमध्ये २ व जुन्नर तालुक्यात एका टँकरला मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही व जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यानंतरही मार्चअखेरपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली होती. जानेवारी महिन्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ३७५ गावे व १५५८ वाड्यांवर टंचाई जाहीर करीत २१ कोटी २० लाखांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी देत त्यातून १०९५ कामे प्रस्तावित केली होती. यात टँकरने व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ९ कोटींची रक्कम ठेवली आहे. त्यानंतर मार्च महिन्यात टँकरची मागणी झाल्यानंतर फक्त पुरंदर तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात आले होते. बारामती, भोर, आंबेगावमधूनही टँकरची मागणी होती. एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात जिल्हा परिषदेने घेतलेल्या टंचाई आढावा बैैठकीत येथून टँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला होता. टंचाई संपल्यानंतर टँकर मिळणार का? असे सुनावले होते. तसेच टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)