शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे फाल्कन्स- कर्नाटक यांच्यात अंंतिम लढत

By admin | Updated: May 13, 2017 04:48 IST

पुणे फाल्कन्स आणि कर्नाटक स्पोर्ट्स संघांनी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तिसऱ्या आबेदा इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे फाल्कन्स आणि कर्नाटक स्पोर्ट्स संघांनी उपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दोन्ही संघांतील चुरशीचा सामना उद्या रंगणार आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम स्पोटर््स अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित ही स्पर्धा व्ही.एम. गनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ‘ब’ गटातील पहिल्या लढतीत पुणे फाल्कन्स संघाने विमेन स्पोटर््स असोसिएशन (डब्ल्यूएसए) संघावर ३ विकेटने मात केली. डब्ल्यूएसए संघाने २० षटकांत २ बाद ११६ धावा केल्या तर पुणे फाल्कन्स संघाने २० षटकांत ७ बाद ११७ धाव करून विजय मिळविला. लक्ष्याचा पाठलाग करताना फाल्कन्सच्या केतकी खांडेकरने ३९ चेंडंूत २८ धावा तर पूनम जगतापने ३२ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले. माधुरी अगव हिनेदेखील १९ चेंडूंमध्ये २४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. केतकी खांडेकरला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याआधी डब्ल्यूएसए संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाज मुक्ता मगरेने ५२ चेंडूंत ४९ धावा, तर प्रियंका घोडकेने ४२ चेंडूंत ३५ धावा केल्या. चार्मी गवईने नाबाद १५ धावांची खेळी केली. फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला तरी डब्ल्यूएसए संघाच्या गोलंदाजांनी निराशा केली. दुसऱ्या लढतीत कर्नाटक स्पोटर््स संघाने सेंट्रल रेल्वे संघावर ४ विकेटनी मात केली. सेंट्रल रेल्वेच्या संघाने २० षटकांत ९ बाद ९३ धावा केल्या तर कर्नाटक स्पोटर््स संघाने १८.३ षटकांत ६ बाद ९७ धावा करीत विजय मिळविला.