शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

प्रवेशद्वार मोजतंय अखेरच्या घटका

By admin | Updated: May 1, 2017 02:00 IST

हिवरेतर्फे नारायणगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पूर्व पश्चिम विस्तारलेला किल्ले नारायणगड इतक्या वर्षांनंतरही

अशोक खरात / खोडदहिवरेतर्फे नारायणगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पूर्व पश्चिम विस्तारलेला किल्ले नारायणगड इतक्या वर्षांनंतरही आपल्या अंगाखांद्यावर कोसळलेल्या अवस्थेत असलेल्या प्राचीन प्रवेशद्वार व इतर वास्तूंमुळे एक गडकोट किल्ला म्हणून आपली स्वत:ची ओळख देत अखेरचा श्वास घेत उभा आहे.नारायणगडावरील राजवाड्याजवळील कोसळलेल्या प्रवेशद्वाराची गणेशपट्टी, खांब व शेजारीच असलेले सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे शरभशिल्प हे नारायणगडाच्या प्राचीन अस्तित्वाची आजही साक्ष देत आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे नारायणगडावरील ऐतिहासिक वारसा जपत असलेली एक एक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.नारायणगडावर आढळणारी प्राचीन शिल्प, पाण्याच्या टाक्या व येथील इतर प्राचीन वास्तू शिवकालीन (१६ व्या शतकातील) आहेत. नारायणगड हा शिवकालीन असावा असा तर्क दुर्गअभ्यासकांकडून लावला जात आहे. नारायणगडावर एका झाडाचा आधार घेत उभा असलेला काही भाग आणि कोसळलेला काही भाग अशा अवस्थेतील हे दगडी प्रवेशद्वार निश्चित पर्यटकांना व अभ्यासकांना प्राचीन काळात घेऊन जात आहेत.हिवरे, खोडद, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, मंचर येथील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअ‍ॅपवर ‘दुर्गप्रेमी-निसर्गमित्र’ नावाचा ग्रुप तयार केला असून, हा ग्रुप व शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने नारायणगड संवर्धनाचे कार्य दोन वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे.शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून नारायणगडाची कोणतीच दखल न घेतल्याने गडावरील या प्राचीन वास्तू शेवटच्या घटका मोजताना पाहावयास मिळत आहेत. जुन्नर तालुक्यात शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, नारायणगड असे सात किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांपैकी एकमेव नारायणगड असा किल्ला आहे की ज्याचे बुरुज व चोरदिंडी दरवाजा आजही शाबूत आहेत. चोरदिंडी दरवाजा म्हणजे साधारणपणे चार फूट बाय चार फूट रुंदीचे चौकोनी भुयार होय. या भुयारावर वरच्या बाजूने मोठमोठे दगड लावून या दगडांवर माती टाकून हा दरवाजा पूर्णपणे झाकून ठेवला जात असे.विशेष म्हणजे हा चोरदिंडी दरवाजा झाडाझुडपांनी पूर्णपणे वेढलेला असल्याने तो शत्रुसैन्याच्या लक्षात येत नसायचा. शत्रूच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिल्यानंतर किंवा किल्ल्यावर आक्रमण केल्यानंतर किल्ल्यावरील सैनिक या चोरदिंडी दरवाजावरील माती व दगड बाजूला करून दोराच्या सहायाने खोल दऱ्यांच्या मार्गे सुखरुप निघून जात असत.वेळप्रसंगी पुन्हा त्याच मार्गाने किल्ल्यावर येऊन शत्रूसैन्यावर पुन्हा नव्या जोमाने हल्ला चढवायचा आणि त्यांना नेस्तनाबूत करायचे. केवळ याच दोन मुख्य कारणांसाठी या चोरदिंडी दरवाजाचा वापर केला जायचा.