शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

केबल डक्टच्या कामाला अखेर मंजुरी

By admin | Updated: July 1, 2017 08:03 IST

एस्टिमेट कमिटीने दोन वेळा नकार देत फेटाळलेले आॅप्टिकल फायबर केबलसाठीच्या डक्टच्या २२५ कोटी रुपयांच्या कामाला अखेर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एस्टिमेट कमिटीने दोन वेळा नकार देत फेटाळलेले आॅप्टिकल फायबर केबलसाठीच्या डक्टच्या २२५ कोटी रुपयांच्या कामाला अखेर कमिटीची मंजुरी मिळवण्यात आयुक्त कुणाल कुमार यांना यश आले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या कामाला मंजुरी देत कमिटीने पूर्वी दिलेल्या नकारावर होकाराचे शिक्कामोर्तब केले. आयुक्तांनी त्यासाठी खास प्रयत्न केले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.समान पाणीपुरवठा योजनेच्या कामात हे काम आयुक्तांनी टाकले होते. त्यासाठी नियमाप्रमाणे एस्टिमेट कमिटी, स्थायी समिती, सर्वसाधारण समिती यांची संमती घेण्यात आली नाही. त्यावरून बराच ओरडा झाला. या कामाची निविदाही मंजूर झाली असून त्यावरूनही वाद निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले की मुळातच एका कामात दुसरे काम व तेही २२५ कोटी रुपयांचे समाविष्ट करून एकत्रितपणे मंजूर करून घेणे बेकायदेशीर आहे. एस्टिमेट कमिटी ही कामाच्या सोयीसाठी तयार केलेली कमिटी आहे. कोणतेही काम स्थायी समितीत व सर्वसाधारण सभेत मंजूर झाले पाहिजे असे बागुल म्हणाले. या कामाला मंजुरी मिळाली असली तरी पुढे त्यात कायदेशीर अडचणी येणारच आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान या २२५ कोटी रुपयांच्या डक्टच्या कामांच्या निविदा प्रक्रियेलाही काही जणांनी हरकत घेतली आहे. त्यात प्रामुख्याने महापालिकेच्याच विधी विभागाने प्रक्रियेत त्रुटी असल्याचा अभिप्राय दिला आहे. बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी डक्टच्या कामात कमिटीने यापूर्वी ज्या त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या त्याचे निराकरण केले. त्यामुळे प्रस्ताव समाधानकारक आहे असे मत व्यक्त करून या कामाला मंजुरी दिली.