शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारपात्र होण्यापेक्षा चित्रपट दखलपात्र व्हावा

By admin | Updated: February 7, 2017 03:15 IST

चित्रपट या माध्यमाचे समाजमनावर प्रतिबिंब उमटत असते. या माध्यमातून मनोरंजन करतानाच चांगले विचार आणि संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत

पुणे : चित्रपट या माध्यमाचे समाजमनावर प्रतिबिंब उमटत असते. या माध्यमातून मनोरंजन करतानाच चांगले विचार आणि संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी निर्मिती आणि दिग्दर्शनापासूनच मूल्ये रुजली पाहिजेत. कारण, चित्रपट पुरस्कारप्राप्त होण्यापेक्षा दखलपात्र होणे अधिक महत्त्वाचे असते. चित्रपटनिर्मितीतून शिक्षणाची मूल्ये जपली जावीत, असे मत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले.मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्थेची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने ओमकार क्रिएशन संस्थेच्या वतीने ‘चित्रपट माध्यम, मनोरंजन आणि शिक्षण संवर्धन’ या विषयावरचा परिसंवाद सोमवारी पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात राजेभोसले यांच्यासह पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहोळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पुणे महानगरपालिकेच्या सहायक प्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे, पश्चिम महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रमोद नेमाडे, दिग्दर्शक विश्वास रांजणे यांनी सहभाग घेतला. शिल्पकला रंधवे यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)