शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मुख्य रस्त्यावरच भरते मंडई

By admin | Updated: July 7, 2017 03:26 IST

स्वतंत्र जागा नसल्याने नेहरूनगरमध्ये मंडई मुख्य रस्त्यावरच भरत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेहरूनगर : स्वतंत्र जागा नसल्याने नेहरूनगरमध्ये मंडई मुख्य रस्त्यावरच भरत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मासूळकर कॉलनीमध्ये अद्ययावत मंडई असूनदेखील फक्त एकच दिवस मंडई भरते, तर संत तुकाराम नगरमध्ये मंडई मद्यपींचा अड्डा बनली आहे.येथील संतोषी माता चौक ते श्रीजी कॉम्प्लेक्स चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळे, भाजी, खाद्यपदार्थ विक्रेते, तसेच इतर व्यावसायकांनी अतिक्रमण केले असून, त्यामुळे चालकांना वाहन चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेहरु चौकात तर पदपथावरही भाजी-फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. सायंकाळी या चौकात वाहतूककोंडी नेहमीची झाली आहे. याच चौकात बस थांबादेखील आहे. बसचालकांनाही रस्त्याच्या एका बाजूला बस घेण्यासाठी कसरत करावी लागते. प्रवाशांना उतरताना-चढताना त्रास सहन करावा लागतो. क्रांती चौकातही हीच परिस्थिती आहे. सायंकाळी भाजीविक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण केले असल्यामुळे या रस्त्यावरदेखील अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणविरोधी विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी येतात; मात्र कारवाईचा देखावाच केला जातो. ठोस कारवाई कोणावरही होत नाही. त्यामुळे अतिक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या अतिक्रमणावर तोडगा काढण्यासाठी या भागात मंडई उभारावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.मासूळकर कॉलनी येथील रसरंग चौक ते मोरवाडी म्हाडा चौकापर्यंत रस्त्यावर जागोजागी विविध विक्रेत्यांसह येथील रहिवाशांनी रस्त्यालगत असलेल्या इमारतींमधील वाहनतळाच्या जागेत दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता दुभागला जात असून, वाहनचालक व पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर अपघातदेखील घडलेले आहेत.विशेष म्हणजे या भागात मंडई असतानादेखील विक्रेते या मंडईचा उपयोग करीत नाहीत. या प्रभागामध्ये महापालिकेने लाखो रुपये खर्चून बांधलेली मंडई वापराअभावी कित्येक वर्षांपासून बंद होती. मात्र वर्षभरापासून या ठिकाणी आठवडा बाजार भरवला जात आहे. त्यामुळे आठवड्यात फक्त एकच दिवस या ठिकाणी मंडई भरते. इतर वेळी या जागेचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठी केला जात आहे. मंडईलगतच्या हॉकर्स झोनची जागादेखील धूळखात पडून आहे.संत तुकारामनगर : मद्यपींचा होतोय त्राससंत तुकारामनगर परिसरात देखील महापालिकेने मोठी, गोलाकार मंडई बांधलेली असून, या मंडईमध्ये भाजीविक्रेते कमी मात्र इतर व्यावसायिकच जास्त आहेत. त्याचबरोबर ही मंडई अनेक तरुणांसाठी सिगरेट-दारू पिण्याचा अड्डा बनली आहे. महेशनगर ते संत तुकारामनगर परिसरात देखील जागोजागी वाहनांमधून, तर कुठे हातगाडीवर भाजीविक्रेते भाजी विक्री करतात. रस्त्यावर कोठेही ते उभे राहत असल्यामुळे इतर चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.मंडईसाठी बांधलेल्या इमारती धूळखात पडून आहेत. त्याठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बसणाऱ्या मद्यपींवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मंडईच्या इमारतीचा दुरुपयोग सुरू आहे.