शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिका स्वत: देण्यावर भर

By admin | Updated: March 3, 2016 01:40 IST

मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे

पुणे : मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे. यंदा निवडणूक प्रक्रियेला ‘शिस्त’ लावण्यात आली असल्याने मतपत्र्किा स्वत: देण्याकडे मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे.मसाप निवडणूक कि ंवा साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणुकीत नेहमी गोंधळाचे वातावरण असते. मतपत्रिका एकगठ्ठा आणून दिल्या जातात. पण, या निवडणुकीत मतपत्रिकांचा गोंधळ होण्याचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. त्यामुळे मतदारांकडून मतपत्रिका पाठविण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतु या काहीशा कडक धोरणामुळे उमेदवारांची मात्र पंचाईत झाली आहे. गतवेळची मसापची निवडणूक ही मतपत्रिकांची पळवापळवी, बोगस मतपत्रिकांमुळे गाजली. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये आणि मतदारांचा निवडणूकप्रक्रियेमध्ये थेट सहभाग वाढावा, या उद्देशाने यंदा प्रथमच निवडणूकप्रक्रियेचे धोरण काहीसे कडक करण्याबरोबरच त्याला ‘शिस्त’ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतपत्रिकेला बारकोड लागू करण्याबरोबरच मतदारांनी मतपत्रिकेबरोबरच ओळखपत्र सादर करणे आणि मतपत्रिकेला पोस्ट क्रमांक देणे या गोष्टींमुळे मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शक ठरली आहे. त्यामुळे मतपत्रिका पाठविण्याचा ओघ वाढत आहे.बाहेरगावचे प्रतिनिधी स्वत: मतपत्रिका आणून देत असले, तरीही ज्या व्यक्तीने आणून दिले तिचे नाव, पत्ता याची नोंद ठेवली जात आहे. उमेदवारांविरुद्ध तक्रार किंवा बोगस मतपत्रिका आढळल्या, तर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यात ११ हजार मतदार आहेत. आजमितीला अंदाजे दीड ते दोन हजार मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे निवडणूक अधिकारी परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)