शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी निधी पळविणा-यांवर गुन्हे दाखल करणार

By admin | Updated: November 8, 2014 00:27 IST

राज्यघटनेतील तरतुदीनुसार समाजकल्याण विभागाचा निधी इतर विभागांकडे वळविता येत नाही.

पुणे : राज्यघटनेतील तरतुदीनुसार समाजकल्याण विभागाचा निधी इतर विभागांकडे वळविता येत नाही. मात्र, मागील काही वर्षांत समाजकल्याणचा निधी मोठ्या प्रमाणात इतर कामांकडे वर्ग केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा २३00 कोटींचा निधी अन्यत्र वळविण्यात आला. या प्रकाराची सखोल चौकशी केली जाणार असून, संबंधित दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असे सामाजिक न्याय व आदिवासी विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर कांबळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे शहर सरचिटणीस रमेश काळे, डॉ. शिवाजी सरोदे, रवींद्र पाटील, रवींद्र धुमाळ, गणेश डांगे, संतोष इंदुरकर आदी या वेळी उपस्थित होते. पुढील काळात सामाजिक न्याय विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा विश्वास व्यक्त करून कांबळे यांनी यापूर्वी झालेले चुकीचे निर्णय रद्द करणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की यापूर्वी युतीच्या काळातही या विभागात कामाचा अनुभव आहे. मात्र, त्या वेळची परिस्थिती व सद्यस्थितीत खूप फरक आहे. मधल्या काळात काही चुकीचे निर्णय झाले आहेत, त्याचा अभ्यास करून त्यात बदल करण्याची भूमिका घेणार आहे. समाजकल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा निधी इतरत्र वळविल्याबद्दल कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे निधी इतरत्र वळविल्याबद्दल संबंधितांवर आणि शिष्यवृत्तीचा पैसा इतर कामांसाठी वापरणाऱ्या महाविद्यालयांवरही गुन्हे दाखल केले जातील. शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांना दोन टप्प्यांतच मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. दलालांना हद्दपार करणार...जिल्हा परिषदेमार्फत होणारी समाजकल्याण विभागाची कामे यापुढे थेट सामाजिक न्याय विभागच हाती घेणार आहे. या कामांमधील जिल्हा परिषदांची दलाली बंद केली जाईल. निधी असूनही कामे झालेली दिसत नाहीत. सामाजिक न्याय विभागाची यंत्रणा गावपातळीपर्यंत पोचविण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध महामंडळांकडून दिली जाणारी कर्जे यापुढे दिली जाणार नाहीत. त्याऐवजी संबंधित लाभार्थ्यांना गरजेनुसार थेट व्यवसाय उभा करून दिला जाईल. तसेच त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षणही देण्यात येईल. बँकांमध्ये महामंडळाची पत राहिली नाही. ही पत मिळवून देऊ, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला. राज्यातील काही कायदे फार पूर्वीचे आहेत. केवळ कायद्यातील तरतुदींमुळे विकासाला अडथळे निर्माण होत असतील तर ते बदलले जातील. यांसह सामाजिक न्याय विभागात पुढील सहा महिन्यांत बदलाचा प्रयत्न सुरू केला जाईल. विभागाच्या सद्यस्थितीबाबत चांगल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर निर्णय घेणार आहे.