शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST

याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ बाबा शिदोरे यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवसरी खुर्द ...

याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ बाबा शिदोरे यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत कार्यलयात शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तक्रारदार ग्रामविकास अधिकारी शिदोरे, सरपंच जगदीश अभंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोणे गावातील विकासाच्या दृष्टीने चर्चा करत होते. त्या वेळी विशाल विलास भोर (रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) याने ग्रामपंचायतीमध्ये येऊन घराचा उतारा मागितला. त्यास थकीत घरपट्टी भरण्यास ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले असता विशाल भोर याने मी थकीत घरपट्टी आत्ता व यापुढे देखील भरणार नाही. तुम्हाला काय करायाचे असेल ते करा. मी तुम्हाला काम करू देणार नाही, असे म्हणत ग्रामविकास अधिकारी शिदोरे यांना शिवीगाळ, दमदाटी करत समोर असलेल्या टेबलवर जोरजोरात हात आपटत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी विशाल भोर याच्या विरुद्ध ग्रामविकास अधिकारी शिदोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश डावखर करत आहे.