शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कार्ल्यात मिरवणुकीत मारामारी

By admin | Updated: April 14, 2016 02:14 IST

कार्ला गडावर आई एकवीरेच्या पालखी सोहळ्यापूर्वी मानावरून ठाण्याचे भाविक व पेणचे पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याने सोहळ्याला गालबोट लागले.

लोणावळा : कार्ला गडावर आई एकवीरेच्या पालखी सोहळ्यापूर्वी मानावरून ठाण्याचे भाविक व पेणचे पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याने सोहळ्याला गालबोट लागले.आई एकवीरेचा पालखी सोहळा पाहण्यासाठी, तसेच देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक गडावर आले होते. पालखीचा याची देही याची डोळा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सायंकाळी ५पासून गर्दी केली होती. गडावर पालखीचा मान हा पुरवापार पेणचे वास्कर व चौलचे आग्राव याचा असताना ठाण्याच्या काही भाविकांनी लाँबिंग करून पालखीचा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याने पावणेसात वाजता पेणकर व ठाणेकर यांच्यात जोरात हाणामारी झाली. यात पेणकरांनी ठाणेकरांच्या तावडीतून पालखी ताब्यात घेत मिरवणूक सुरू केली. यामुळे चिडलेल्या ठाण्यातील भाविकांनी गडावर गोंधळ घालत स्टेजवर दगडफेक करत स्टेजची तोडफोड करत आँर्केस्टाच्या कलाकारांवर हल्ला चढविला. तसेच काही कँमेऱ्यांची तोडफोड केली, तसेच ट्रस्टच्या वस्तूची मोडतोड करत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. यामुळे काळ गडावर गोंधळ निर्माण झाला होता. (वार्ताहर)गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई कराएकवीरा देवीच्या पालखी सोहळ्यात गोंधळ घालत हाणामारी व दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी कडक कारवाई करा, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. एकवीरा देवीचा पालखीचा मान पारंपरिक पेणकरांचा आहे. मात्र, मागील ७ ते ८ वर्षांपासून ठाणेकर हा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रस्ट मात्र पेणकरांना हा मान राहावा या भूमिकेत असल्याने ठाणेकरांनी आज गोंधळ घालत ट्रस्टच्या वस्तूची तोडफोड करत हाणामारी व गोंधळ घातला.