शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लढाऊ विमानांची होणार आता निर्धोक भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:51 IST

लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात.

निनाद देशमुख पुणे : लढाऊ विमाने उडवण्यासाठी वैमानिकांकडे अतिउच्च कौशल्याची गरज असते. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे तसेच मानवीय चुकांमुळे विमानांचे अपघात होतात. भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी तसेच वैमानिकांचा थकवा तसेच तणाव कमी करून त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी डीआरडीओच्या सहकार्याने नव्या यंत्रणेचा विकास करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात भारतीय हवाई दलातील वैमानिक कठीण परिस्थीतही चांगली कामगिरी करू शकणार आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या आरोग्य विभागाचे प्रमुख एअर मार्शल पवन कुमार यांनी दिली.लढाऊ विमाने उडवण्यासाठी अनेक कसोट्यांना वैमानिक पुढे जात असतात. तासन्तास विमानाचे उड्डाण करताना तणाव, थकवा तसेच अनेक मानसिक आव्हानांचा सामना वैमानिकांना करावा लागतो. या परिस्थितीत चुका होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे वैमानिकांवरील तणाव कमी असणे गरजेचे असते. यासाठी डीआरडीओच्या साह्याने नवी यंत्रणा विकसित करण्यात येत असून वैमानिकांवर याचे काय परिणाम होतात, याच्या चाचण्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या, उड्डाणापूर्वी वैमानिकाच्या पूर्व-वैद्यकीय चाचण्या वायुसेनेतर्फे घेतल्या जातात. वैमानिकांसाठी तयार करण्यात येणारी नवी यंत्रणा ही सध्यस्थितीत असलेल्या यंत्रणेपेक्षा अधिक प्रभावी आहे. ही यंत्रणा अधिक वस्तूनिष्ठ आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या तपासणीत न आढळलेल्या गोष्टी या यंत्रणेद्वारे माहिती करणे शक्य होणार आहे. वैमानिकांच्या डोळ्यांच्या हालचाली, शारीरिक हालचाली, त्याची मानसिक स्थिती अभ्यासता येणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यास अधिक सोपी असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परदेशात वैमानिकांना येणाºया अडचणी तपासण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा विकास झाला आहे. भारतातही या सारख्या यंत्रणेची गरज होती. या नव्या यंत्रणेमुळे वैमानिकांना अधिक सक्षम बनवता येणार आहे.वैमानिकांना अनावर होणारी झोप यावर संशोधन सुरू आहे. यासाठी ४० वैमानिकांची चाचणी घेण्यात आली होती. यात अनेक तथ्ये पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लांब पल्यांच्या उड्डाणावेळी सतर्क राहण्यासाठी तसेच झोप टाळण्यासाठी वैमानिकांद्वारे काही औषधांचे सेवन करण्यात येते. यामुळे अल्पझोपेच्या तक्रारीवर मात करता येते. लढाऊ विमान चालवतांना वैमानिकाला सतर्क राहावे लागते. एक छोटीशी चूक अपघातासाठी कारणीभूत ठरू शकते.एका विमानाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते. त्यामुळे हवाई दलाला असे अपघात परवडणारे नसतात.अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे वैमानिकाचा थकवा तसेच तणाव कमी करता येईल, आणि मानवी चुका टाळता येतील, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका वैमानिकाने सांगितले.