शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
2
वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...
3
Dollar Vs Rupee: अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ ! भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण; तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?
4
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
5
६० व्या वर्षी ₹५००० चं पक्कं पेन्शन, पात्रतेसोबत जाणून घ्या अर्ज करायची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
6
तामिळनाडूत शाळा बंद, जम्मू काश्मीरसह MP, UP मध्येही शाळांना दिर्घ काळ सुट्टी घोषित, कारण काय?
7
भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
8
प्रभाग पुनर्रचनेला आव्हान, सुनावणीला सुरुवात; मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी काय सांगितलं? 
9
अमिताभ, शाहरुख आणि हृतिक 'अ‍ॅक्टिंग'शिवाय कमावतायेत कोट्यवधी; 'या' क्षेत्रात कलाकारांची मोठी गुंतवणूक
10
पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला! 
11
घरवापसी! एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत परतले
12
विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; तब्बल १६ वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये घडणार असा प्रकार
13
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
14
इन्स्टावरची मैत्री पडली महागात; नवरदेवाला लग्नानंतर ३ दिवसांनी कळलं नवरी आहे २ मुलांची आई
15
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
16
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
17
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
18
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
19
नौदलाच्या आक्रमणामुळे पाकिस्तानने टाकली नांगी; व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांचे विधान
20
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेशी लढा, मग खेळा!

By admin | Updated: December 19, 2014 01:52 IST

संयोजनासाठी करण्यात येणाऱ्या बेलगाम अंदाजित खर्चामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या महापौर चषक स्पर्धेतील कबड्डी स्पर्धाही खेळाडूंसाठीच्या ढिसाळ नियोजनामुळे चर्चेचा विषय ठरणार आहे.

सुनील राऊत, पुणेसंयोजनासाठी करण्यात येणाऱ्या बेलगाम अंदाजित खर्चामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या महापौर चषक स्पर्धेतील कबड्डी स्पर्धाही खेळाडूंसाठीच्या ढिसाळ नियोजनामुळे चर्चेचा विषय ठरणार आहे. ही स्पर्धा येत्या शनिवारी (दि. २०) रोजी सुरू होणार असली तरी, या स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूंना पालिकेच्या अर्धवट काम झालेल्या आणि कमालीचे अस्वच्छ असलेल्या सणस मैदानतील क्रीडा हॉस्टेलमध्ये आपला मुक्काम करावा लागणार आहे. स्पर्धा शनिवारी सुरू होणार असल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळपासूनच राज्यभरातील स्पर्धक या हॉस्टेलमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हॉस्टेलच्या जागी जाऊन पाहणी केली असता, अर्धवट बांधकाम झालेल्या खोल्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, अर्धवट विद्युत व्यवस्था, तर काही ठिकाणी चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पालिकेकडून महापौर चषकाअंतर्गत ६१ वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा शनिवारी धनकवडी येथील तीन हत्ती चौकाच्या परिसरात होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील पुरुष आणि महिला संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ६०० ते ७०० खेळाडू येणे अपेक्षित आहे. या खेळाडूंची निवासव्यवस्था सणस मैदानातील महापालिकेने उभारलेल्या क्रीडा हॉस्टेलमध्ये केली आहे. मात्र, ८० खोल्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहातील सुमारे २० ते २५ खोल्यांचेच काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे ही जागा या खेळाडूंना अपुरी पडणार आहे. मात्र, या हॉस्टेलचे काम अर्धवट असून, संपूर्ण हॉस्टेलच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे.