शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी फेरी; प्रवेशप्रक्रिया सुरू

By admin | Updated: July 29, 2016 03:52 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी राबविली जात असून विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपासून माहिती पुस्तिका

पुणे : अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी प्रवेश फेरी राबविली जात असून विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपासून माहिती पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुसऱ्या प्रवेश फेरीच्या कट आॅफ पेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या फेरीतून प्रवेश मिळणार आहेत, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.अकरावी प्रवेशावरून विद्यार्थी व पालकांचा गोंधळ सुरू असला तरी शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी आॅनालाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जच केला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका, लॉग इन आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना शहरातील हुजूरपागा व हडपसर येथील एस.एम.जोशी विद्याद्यालयात आणि आकुर्डी येथील गोदावरी हिंदी विद्यालयातून १०० रुपये भरून माहिती पुस्तिका विकत घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी आॅनलईन अर्ज भरला आहे.त्यांना माहिती पुस्तिकेची विक्री केली जाणार नाही.तसेच अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आॅनलाईन अर्ज भरता येणार नाही. मात्र, अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा माहिती पुस्तिका विकत घेण्याची गरज नाही.या फेरीसाठी विद्यार्थ्यांना कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येणार आहेत.(प्रतिनिधी)अकरावीला कोणाला मिळणार प्रवेश पाचव्या आॅनलाइन प्रवेश फेरीतून दुस-या आॅनलाईन प्रवेश फेरीच्या कट आॅफ पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकताना संबंधित महाविद्यालयाचा दुस-या यादीचा कट आॅफ किती होता. हे तपासून मगच प्रवेश अर्जात महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकावेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर कट आॅफ ची माहिती उपलब्ध करून दिली जाईल,असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.