शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल, रिव्हॉल्व्हर दाखवून जमीन लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

पावणे सात कोटींची जमीन, शिवाजीराव भोसले बँकेतील अधिका-याचाही सहभाग पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास ...

पावणे सात कोटींची जमीन, शिवाजीराव भोसले बँकेतील अधिका-याचाही सहभाग

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. बांदल याने एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले व परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिवाजीराव भोसले बँकेतील एका अधिकार्‍याचा सहभाग आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मंगलदास बांदलसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध ३४२, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३४ सह आर्म अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे २०१३ मध्ये व त्यानंतर वेळोवेळी घडला आहे.

फिर्यादी यांची हवेली तालुक्यात गट क्र. १५३/१ मध्ये ३ हेक्टर ७१ आर जमीन आहे. बांदल व इतरांनी फिर्यादी यांना चारचाकी गाडीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करुन व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. तसेच त्यांच्या परस्पर ६ कोटी ७५ लाख रुपये काढून घेतले. या जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मागणी केली. त्याचे राजकीय लांगेबांधे असल्याचे फिर्यादी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यास ते फिर्यादीच्या कुटुंबियांना त्रास देतील म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली नव्हती. त्यांनी अद्यापर्यंत फिर्यादीचे जमिनीवरील बोझा कमी केला नाही.

पुण्यातील सराफ व्यावसायिकाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांनी मार्च २०२० मध्ये अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे़

-------------------

शिक्रापुरात तीन गुन्हे दाखल

शिक्रापूर पोलीस ठाण्यात मंगलदास बांदल याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी २६ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना रवींद्र सातपुते यांची फिर्याद दाखल झाली होती.

-----------------